हिंगोली : जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन विविध स्पर्धा

राजेश दारव्हेकर
Thursday, 24 September 2020

शाळास्तर ते तालुकास्तरावर शंभर टक्के शाळा व केंद्रानी सहभाग नोंदविणे बंधनकारक आहे याची सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षकांनी नोंद घ्यावी.

हिंगोली : जिल्हा परिषद शाळांमधील इयता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गणित,  सामान्यज्ञान स्पर्धांचे आयोजन (ता. २९) पासून शाळा स्तर, केंद्रस्तर तालुकास्तर व जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. 

शाळास्तर ते तालुकास्तरावर शंभर टक्के शाळा व केंद्रानी सहभाग नोंदविणे बंधनकारक आहे. याची सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी नोंद घ्यावी. शाळास्तरावर चित्रकला स्पर्धा पहिली ते दुसरी मुक्त चित्र, तीसरी ते दहावी कोरोना काळातील जीवन हा चित्रकलेचा विषय आहे. तालुकास्तरावर प्रत्येक वर्गातील सर्वोत्कृष्ट तीन चित्र जिल्हास्तरावर पाठवितील .१४ केंद्रातील सर्वोत्कृष्ट चित्रास गटशिक्षणाधीकारी पारितोषिक देतील.

हेही वाचा -  हिंगोली : तुरीच्या डाळीने शंभरी गाठली

निबंधस्पर्धाचे विषय

रम्य ती शाळा, माझे आवडते शिक्षक, कोरोनापासुन रक्षण माझी जबाबदारी, मी शिक्षक झालो तर, माझे आवडते शिक्षक, शाळा बोलू लागली तर कोरोना आलाच नसता तर हे आहेत.

वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट 

तिसरी, चौथी उच्च प्राथमिक गट - पाचवी ते सातवी माध्यमिक गट - आठवी ते दहावी असा राहणार आहे. 

विषय मी कोविड योध्दा, कोरोना काळातील शिक्षण, कोरोना मधील दक्षता, माझी शाळा माझा अभिमान, कोरोना - हे ही दिवस जातील हे विषय असणार आहेत. गणित विषयासाठी दोन गटात स्पर्धा होणार आहे.

येथे क्लिक कराहिंगोलीत खळबळ : पोलिस निरीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी

सामान्यज्ञान स्पर्धा

सदर स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी शिक्षकांनी स्पर्धेची लिंक विषयी, प्रश्नाविषयी, गुणाविषयी माहिती कळवावी.प्रत्येक शाळानी  सहभागी होणे बंधनकारक आहे. या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यामधील सर्व जिप शाळामधील विद्यार्थ्यांनी  सहभागी होऊन सदर स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहान प्राथमिक शिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Online organization of various competitions for the students of Zip School hingoli news