esakal | हिंगोली : कोविडची तिसरी लाट येण्यापूर्वी नियोजन करा- पालक सचिवांच्या सुचना
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली : कोविडची तिसरी लाट येण्यापूर्वी नियोजन करा- पालक सचिवांच्या सुचना

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : येथे जिल्ह्याचे पालक सचिव तथा उपायुक्त जगदीश मिनियार यांनी गुरुवारी (ता. १०) हिंगोलीत अचानक धावती भेट देऊन विविध विभागाचा आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात भेटी दरम्यान त्यांनी कोविडची तिसरी लाट येण्यापूर्वीच नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्ह्याचे पालक सचिव जगदीश मिनियार यांनी जिल्ह्याचा दौरा करुन जिल्ह्यात विविध विभागामार्फत चालू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी महसूल, कृषी विभाग, पीक कर्ज, सुंदर माझे अभियान तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडून चालू असलेल्या योजनेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भूसंपादन उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतूल चोरमारे, प्रशांत खेडेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी धनवंतकुमार माळी, डॉ. मिलिंद पोहरे, गणेश वाघ, डॉ. शिवाजी पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, बँकेचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - इंधन दरवाढीच्या रूपाने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे

तत्पूर्वी मिनियार यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन ऑक्सिजन प्लांटची पाहणी करुन कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कोविडचे संकट सुरु असताना दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले त्यात काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे येणारी तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य विभागाने नियोजन करावे, बालकांसाठी कक्ष व आँक्सीजन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या.

त्यानंतर त्यांनी कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी येथे जाऊन घरकुलांची पाहणी करुन तेथे वृक्षारोपण केले. आणि वॉटर कबमध्ये चांगले काम केल्याबद्दल संबंधित संस्थेचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी वृद्ध लोकांना योजनेचा लाभ मिळतो का नाही याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाअधिकारी कार्यालयातील परिसरात वृक्षारोपण केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे