Hingoli : ‘PM Kisan’ डाटा अपलोडचे काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM kisan kyc

Hingoli : ‘PM Kisan’ डाटा अपलोडचे काम पूर्ण

औंढा नागनाथ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पी. एम. किसान योजनेतील ४६ हजार ३५१ पात्र लाभार्थ्यांची तांत्रिक माहिती भरण्याचे (डाटा अपलोड) करण्याचे काम महसूल विभागाने पूर्ण केले आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे ज्या विभागाची ही योजना आहे, त्या कृषी विभागासह ग्रामविकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे भूमिकेमुळे हा सर्व पडलेला भार महसूल विभागाने पेलत हे काम पूर्ण केले. यामुळे औंढा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र शासनाकडून पात्र लाभार्थ्यांनी दर चार महिन्याला दोन हजार याप्रमाणे एका वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आवश्यक डाटा (तांत्रिक माहिती) आणि संबंधित लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण न केल्याने हे अनुदान मिळण्यास अडचण येत आहे. हा डाटा अपलोड करण्यात औंढा तालुक्यात काहीशी अडचण येत होती. मात्र, महसुल विभागाने हे सर्व काम रात्र दिवस करत ‘पीएम किसान’चे डाटा अपलोडचे काम पूर्ण केले.

पीएम किसानचा डाटा अपलोड करण्यासाठी तहसीलदार डॉ. कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार लता लाखाडे, महसूल सहायक इर्शाद पठाण, संतोष पोले, राघव जोशी, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी परिश्रम घेतले. १२२ गावांचा डाटा अपलोड करणे पूर्ण झाले आहे.

Web Title: Hingoli Pm Kisan Data Upload Work Completed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..