Hingoli Crime : हिंगोलीतील छाप्यात ८० हजार रुपयांचा गांजा जप्त, तीन आरोपींवर गुन्हा दाखल
Ganja Seizure : हिंगोली शहरात पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून ८०,००० रुपये किमतीचा तीन किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ८० हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २४) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.