
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात महा इती मधील शिवसेना आणि भाजपामध्ये सातत्याने धुसफूस पाहायला मिळते आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षातील नेत्यांचा वाद समोर आला आहे. कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्यावर अधिकाऱ्यांकडून पैसे घेतात असा आरोप केले नंतर घुगे यांनी देखील बांगर यांच्यावर पलटवार केला आहे.