esakal | हिंगोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस, औंढ्यात पुरामुळे पुल तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील बहरलेल्या सोयाबीन पिक.

हिंगोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस, औंढ्यात पुरामुळे पुल तुटला

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) आज पहाटेपासून पावसाची (Rain) रिमझिम सुरू असून दिवसभर सूर्यदर्शन देखील झाले नाही. बुधवार (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत १६.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १६.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे मिलिमीटरमध्ये हिंगोली १५.७०, कळमनुरी (Kalamnuri) १७, वसमत (Vasmat) २१.३०, औंढा (Aundha Nagnath) १२.४०, तर सेनगाव (Sengaon) १६.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६०.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. या पावसाने शेतातील (Agriculture) कामे थांबल्याचे शेतकरी सांगत आहेत. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदुर हा पाऊस झाला आहे. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव तालुक्यात झाला आहे. (hingoli rain news light showers in district glp88)

हेही वाचा: जनावरे चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परभणीत कारवाई

औंढा तालुक्यात झालेल्या पावसाने जामगव्हाण गावाजवळील ओढ्याला आलेल्या पुराने पुल तुटला. यामुळे सात गावांचा संपर्क तुटला आहे. या वर्षी आतापर्यंत पावसाळा सुरू झाल्यावर तीन नक्षत्र संपले असुन सोमवारपासून (ता.१९) पुष्य नक्षत्र सुरू झाले आहे. यापूर्वी मृग व पुनर्वसू नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले आहे. पिकाच्या वाढीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून सलग पाऊस सुरु आहे. यामुळे शेतातील आंतरमशागत करण्यासाठी अडचणी येत आहेत.

नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान : जिल्ह्यात नदीकाठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाने नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पिके व जमीन खरडून गेल्याचे शेतकरी सा़ंगत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांत देखील पावसाचे पाणी जमा झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नव्हते. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती.

loading image