esakal | जनावरे चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परभणीत कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

परभणीत स्थानिक गुन्हे शाखेने जनावरे चोरणाऱ्या टोळीचे पर्दाफाश केला.

जनावरे चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परभणीत कारवाई

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : जनावरे चोरी (Cattle Stealing) करून ते विक्री करणाऱ्या तीन चोरट्यांच्या एका टोळीस येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने मंगळवारी (ता.२०) रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ८५ हजार रुपये जप्त करण्यात आला आहे. परभणी (Parbhani) येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी गस्त घालत असतांना त्यांना माहिती मिळाली होती. जिल्ह्यातील बैल चोरी करणारे तीन आरोपी परभणी शहरात व परिसरात जनावरे चोरी करण्याकरिता रेकी करत फिरत आहेत. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व्यंकटेश आलेवार, फौजदार साईनाथ पुयड, पोलिस कर्मचारी हनुमंत जक्केवाड, बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, शेख अझहर, किशोर चव्हाण, हरिचंद्र खुपसे, सय्यद मोबीन, संतोष सानप, श्री.मुरकुटे, पिराजी निळे, संजय घुगे यांच्या पथकाने या चोरट्यांची माहिती काढत त्यांना बुधवारी सांयकाळी धर्मापुरी (ता.परभणी) येथे प्रसाद शेषराव देवरे (वय २६), गोपाल रंगनाथ देवरे (वय ३४), हर्षवर्धन प्रकाश कसबे (वय २८) (सर्व रा.थोरावा, ता. वसमत जि.हिंगोली) या तीन आरोपी आढळून आले.(cattle stealing gang arrested in parbhani glp88)

हेही वाचा: पावसाळ्यात तांदळाला किड्यांपासून वाचवा, 'या' आहेत सोप्या टीप्स

त्यांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी परभणी जिल्ह्यातील बैल व गाय चोऱ्या केल्याचे कबुल केले. चोरलेले बैल व गाय हे परभणी येथील वांगी रोड परिसरातील समीर अहमद महेबुब अहमद कुरेशी (वय ३४, रा. मक्का मशिद जवळ, वांगी रोड, परभणी) या व्यक्तीस विक्री केल्याची माहिती त्यांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८५ हजार रुपये जप्त केले. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात त्यांना हजर करण्यात आले आहे.

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

जनावरे चोरीचे ९ गुन्हे उघडकीस

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.२०) रात्री पकडलेल्या तीन जणांच्या टोळीकडून पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात पोलिस ठाणे पाथरी येथील एक, पोलिस ठाणे चुडावा येथील एक, पोलिस ठाणे परभणी ग्रामीण येथील दोन, पोलिस ठाणे मानवत येथील पाच गुन्हे या टोळीने केले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

loading image