हिंगोलीला दिलासा :  पाच कोरोना रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

राजेश दारव्हेकर
Monday, 13 July 2020

कोरोना केअर सेंटर वसमत अंतर्गत तीन कोरोना रुग्ण यात दोन बहिर्जीनगर, एक गणेशनगर बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. १२) पाच कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथील दोन जे गांधी चौक येथील व  कोरोना केअर सेंटर वसमत अंतर्गत तीन कोरोना रुग्ण यात दोन बहिर्जीनगर, एक गणेशनगर बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. १२) पाच कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आजपर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोनाचे एकुण ३३२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २७७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला एकुन ५५ रुग्णांवर उपचार चालु आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे १६ कोरोना रुग्ण यात एक रिसाला बाजार, एक मकोडी, दोन बहिर्जीनगर, एक गांधी चौक, एक जीएमसी नांदेड, एक पेडगाव, दोन शुक्रवार पेठ, एक नवलगव्हाण, तीन तलाबकट्टा, दोन दौडगाव, एक गवळीपुरा येथील आहेत.

हेही वाचा -  कोरोना इफेक्ट : मामामुळे भाच्यावर गंडांतर, लग्न रद्द, व्हावे लागले क्वारंटाईन

२७७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये १६ कोरोना रुग्ण एक दर्गापेठ, एक रिधोरा, दोन टाकळगाव, एक जयनगर, एक वापटी, सात शुक्रवार पेठ, एक स्टेशन रोड, एक सोमवार पेठ, एक सम्राटनगर येथील रहिवासी आहे. तो उपचारासाठी भरती आहे. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुन नऊ कोरोना रुग्ण दोन विकासनगर, चार नवी चिखली, एक डिग्रस, एक शेवाळा, एक नांदापुर  येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. 

कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार

कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत ११ कोरोना चे रुग्ण एक तलाब कट्टा, एक प्रगतीनगर हिंगोली, तीन भांडेगाव, एक पिंपळखुटा, एक हनवतखेडा, चार कळमकोंडा उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे तीन कोरोनाचे रुग्ण एक केंद्रा बुद्रुक, दोन वैतागवाडी उपचारासाठी भरती आहे. हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन पाच हजार ७६५ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी पाच हजार १४२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाच हजार ५९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

येथे क्लिक करासोयाबीन कंपन्यांच्या अडचणीत वाढ, पुन्हा दोन गुन्हे दाखल

महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये

सद्यस्थितीला ६९६ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी ३३३ अहवाल येणे व थ्रोट स्वब घेणे प्रलंबित आहे. दरम्यान, हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाचे विकार, कॅसर इ. दुर्धर आजार आहेत यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी व काही त्रास झाल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्र ( सामुदाय आरोग्य अधिकारी मार्फत ), प्राथमीक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबुन मोलाचे सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli relief: Five corona patients discharged after recovery hingoli news