हिंगोली : जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संपावर, कामकाज ठप्प

file photo
file photo
Updated on

हिंगोली : औरंगाबाद विभागातील रखडलेल्या पदोनत्या , फोजदारी प्रकरणातील आरोपी, संशयित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देणे आदी मागण्यासाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेने  दोन दिवस संपावर जात असल्याचे निवेदन बुधवारी (ता. २८)  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे सादर केले. कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील महसूल कार्यालय ओस पडले असून कामकाज ही ठप्प पडल्याचे चित्र दिसून आले.

महसूल विभागातील अव्वल कारकून, यांना नायब तहसीलदार तर नायब तहसीलदार यांना तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात यावी, फोजदारी प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमाच्या अधीन राहून पदोन्नती दयावी या मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने सामूहिक रजा आंदोलन पुकारून संपावर गेल्याने जिल्ह्यातील पाच तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा कचेरीतील महसूल कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प पडल्याचे दिसून आले.

कर्मचारी संघटनेने संप रेटून धरल्याने संपूर्ण विभागातील कामकाज ठप्प

राज्यातील इतर विभागात पदोन्नत्या देण्यात आल्या असून केवळ औरंगाबाद विभागात पदोन्नत्या देण्यास का टाळाटाळ केली जाते असा आरोप करून आज व उद्या महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. यापूर्वी देखील अनेकदा निवेदने देऊन सुद्धा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला नाही, त्यामुळे हा प्रश्न महसूल कर्मचारी संघटनेने रेटून धरल्याने संपूर्ण विभागातील कामकाज ठप्प पडले आहे. त्यामुळे आयुक्तांना हा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल.मागण्या मान्य न झाल्यास ता.२० नोव्हेंबर पासून बेमुदत कामबंद ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.

आंदोलनात यांचा आहे समावेश

या रजा आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान पठाण, दिलीप कदम ,सुनील कदम, नागेश बोलके ,सूर्यकांत ततापुरे,गोपाल कंठे, श्रीनिवास कंठे, महिला जिल्हाध्यक्ष कुसुम भिसे, श्रीमती दराडे, वहिदा काजी,श्रीमती लिंबाळकर , श्रीमती इंगोले, श्रीमती भागवत बालाप्रसाद धूत, एस.जारे ,अंकुश सोनटक्के, संजय पाटील, निमजे, विजय कांबळे, गजानन झुंजारे, शम्भूनाथ दुगलकर ,अक्षय गायकवाड, हरी पिसाळ, श्रीकृष्ण दराडे, ईश्वर शेटे, डी. एस. जोशी, यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे

जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या  हितासाठी आम्ही संपात सहभागी होत नसून केवळ बाहेरून पाठिंबा दिला आहे.

- सय्यद अयुब सय्यद रसूल, विभागीय अध्यक्ष, तलाठी संघटना 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marriage Fraud
Children of endlife-Affected Farmers from Ardhapur Taluka Pay an Inspiring Visit to NDA
Village Pride Shines in Moscow: Dr. Abhishek Borude Completes MBBS in Russia
Centuries-Old Heritage Under Threat; Preservation Plea for Ardhapur’s Historic Artifacts
Marathi News Esakal
www.esakal.com