
मागील आठ महिन्यात प्रत्येक व्यवसायाला घरघर लागली असून जीवनावश्यक वस्तू व साहित्याच्या मागणीच्या तुलनेत निर्माण झालेला तुटवडा पाहता प्रत्येक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक व कुटुंबियांवर झाला आहे जीवनावश्यक वस्तू पाठोपाठच दैनंदिन लागणाऱ्या वस्तू व साहित्यांच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ पाहता यामध्ये नागरिक भरडला गेला आहे.
कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती पाहता शहरातील उपहारगृह चालकांनी विक्री केल्या जाणाऱ्या चहा व प्रत्येक खाद्यपदार्थाच्या किमतीमध्ये सोमवार ता. २४ पासून वाढ केली आहे त्यामुळे आता उपाहारगृहात चहा व नाष्टा करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना खाद्यपदार्थासाठी अधिकची किंमत मोजावी लागणार आहे.
मागील आठ महिन्यात प्रत्येक व्यवसायाला घरघर लागली असून जीवनावश्यक वस्तू व साहित्याच्या मागणीच्या तुलनेत निर्माण झालेला तुटवडा पाहता प्रत्येक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक व कुटुंबियांवर झाला आहे. जीवनावश्यक वस्तू पाठोपाठच दैनंदिन लागणाऱ्या वस्तू व साहित्यांच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ पाहता यामध्ये नागरिक भरडला गेला आहे.
लॉकडाऊन व त्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये झालेली वाढ चक्रावून टाकणारी ठरली भाजीपाला, इंधन, खाद्यतेल, डाळी, चहा पत्ती, इतर जीवनावश्यक वस्तू च्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. ही भाव वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरीक कुटुंबाप्रमाणेच उपहारगृह व्यवसायिक भाववाढीमुळे अडचणीत सापडले.
हेही वाचा - नांदेड : एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू. धर्माबाद तालुक्यातील घटना -
उपहारगृहामध्ये बनविण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थासाठी लागणाऱ्या साहित्या मध्ये भाजीपाला, खाद्यतेल ,चहा पत्ती, डाळी यांच्या वाढलेल्या किमती उपहारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावा लागणारा पगार अशी सगळी गोळाबेरीज पाहता रोजचा होणारा खर्च व त्यामधून शिल्लक राहणारी अल्पशी रक्कम पाहता मागील काही महिन्यांपासून उपहारगृह चालकांचे आर्थिक गणित कोलमडले गेले होते.
यामधून मार्ग काढण्यासाठी उपहारगृहात विक्री होणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाची वाढ करणे अनिवार्य असल्याचे लक्षात आल्यानंतर शहरातील उपहार गृह चालकांनी शनिवार (ता. २१) एकत्र येत उपहार गृहामधून विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येकी दहा रुपये प्लेट असलेल्या खिचडी, भज्या करिता ग्राहकाला पंधरा रुपये मोजावे लागणार आहेत तर ८० रुपये किलो असलेल्या जिलेबीचा भाव शंभर रुपयांवर गेला आहे. याबरोबरच चहा, कॉपी, आलुबोंडा, पुरी भाजी, बालुशाही, पेढा, पेठा, चिवडा, गुलाब जामुनच्या दरामध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे