हिंगोली : जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी केंद्राना निधी अभावी मिळणार रोहयोचा आधार

file photo
file photo

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडी केंद्राना निधी मिळत नसल्याची नेहमीच ओरड असते. त्यातच सदस्यांच्या शिफारशीमुळे हा तुटपुंज्या निधीचे वितरणही कमी शाळांना कमी प्रमाणा होते. निधीअभावी शाळा व अंगणवाडीचा सर्वागिण विकास साधणे शक्त होत नाही. त्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आत्ता जिल्ह्यात विविध कामे केली जाणार आहेत. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात शिकणे आणि शिकवणे या दोन्ही प्रक्रिया आनंददायी होईल. अशा परिसरात दिवसभर मन प्रसन्न राहील. अशाने शाळेकडे पर्यायाने शिक्षणाकडे मुले आकर्षित होतील. शाळांचा परिसर महात्मा गांची रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुंदर बनवणे शक्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा भौतिक विकास करण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत अनुज्ञेय असणारी काही उपयुक्त ठरू शकतात. याबाबते नियोजन अमरावती जिल्ह्यातील जैतादेही गावात करण्यात आले आहे. हाच पॅटर्न आता राज्यभरात राबविला जाणार आहे. 

अंगणवाडीतही भौतिक विकास व सुशोभिकरण करणे शक्य होणार आहे. जास्त या योजनेतून शाळा व अंगणवाडीमध्ये कोणती अधिक कामे करता येतील याबाबत शासनाच्या रोहयो कामे विभागाने सुचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये शाळेसाठी किचन शेड, शाळा, अंगणवाडीच्या इमारतीसाठी रेन वॉटर हारवेस्टींग संरचना, परिसरात शोषखडा, मल्टी युनिट शौचालय , खेळाचे मैदान , संरक्षक भिंत , वृक्ष लागवड , आवश्यकतेनूसार साधण्यासाठी शाळा व अंगणवाडीच्या  परिसरात पेविंग ब्लॉक ,  शाळा , अंगणवाडीच्या परिसरात  काँक्रिट नाली  बांधकाम , रस्ते गुणवत्तापुर्ण करणे , बोअरवेल पुनर्भरण, गांडूळ खत प्रकल्प यामध्ये तयार होणारे गांडूळ खत शाळा अंगणवाडीच्या परिसरातील निर्णयाची झाडासाठी वापरणे, कंपोस्ट ही कामे रोहयोतून घेतली गेली तर जिल्हा परिषेदच्या शाळांचा तसेच अंगणवाडीचा भौतिक विकास होऊन परिसर सुंदर होण्यास मदत होईल हा उद्देश यातून साधला जाणार आहे .

सदर कामे रोहयोतून घेतल्यास अकुशल मजुरी रोजगार उपलब्ध होणे शक्य होणार आहे. गावात शाश्वत मालमत्ता तयार करणे हे दोन उद्देश साध्य होणार आहेत. सदर कामे हाती घेताना अकुशल कुशलचे प्रमाण प्रत्येकी ६० व ४० टक्के ठेवणे बंधनकारक आहे. ही कामे ग्रामपंचायत पातळीवर न राखता आल्यास जिल्हा पातळीवर राखणे आवश्यक आहे. अकुशल खर्च जितका जास्त असतो त्यासाठी कुशल खर्चास वाव मिळतो . त्यासाठी वृक्षलागवड , सीसीटी , डिप सीसीटी, बॅट, एलबीएस , ढाळीचे बांध अशी जलसंधारणाची कामे घ्यावी या कामामध्ये जास्तीस्त जास्त भाग अकुशल असल्याने मनुष्यदिन निर्मिती अधिक होऊन कुशल खर्चास वाव मिळतो . प्रस्तावित कामे २०२१-२१ या वर्षीच्या रोहयोच्या कृती आराखडयात समावेश करावी लाग आहेत . त्यासाठी मुख्याध्यापक , अंगणवाडीताईनी आपल्या परिसरातील उपलब्ध जागेनूसार आवश्यक कामांची वादी तयार करून ग्रामपंचायतला द्यावी. 

ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी सदर कामांचा समावेश आराखड्यात करावा लागणार आहे . शाळेच्या वापरत नसलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड , बांबू लागवड , पाणलोट अशा प्रकारची कामे हाती घ्यावीत , यातून शाळांना उत्पन्न मिळेल. यातून विविध विकासकामे करणे शक्य होणार आहे . सर्व कामे मनरेगा योजनेच्या माध्यमातून होणार असल्याने शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीला स्वतःजवळील पैसे खर्च करण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्या ग्रामपंचायतमध्ये अकुशल खर्च जास्त नसेल त्यामुळे त्यांना वरिल कामापैकी कुशल खर्च जास्त असलेली कामे घेता येत नसतील तर त्यांनी अभिसरण शासन निर्णयात नमूद कामे अभिसरणमध्ये व्यावीत त्यासाठी त्यांना पार्ट - सी निधी ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोग, आमदार, खासदार निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, जिल्हा वार्षिक निधी अशा योजनामधून वापरता येणार असल्याचे रोहयो विभागाचे प्रधान सचिव  यांच्या स्वाक्षरीनी निघालेल्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com