esakal |  नांदेड : हैदराबाद- जयपूर, सिकंदराबाद- शिर्डी, काकिनाडा- शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

file photo


गाडी संख्या 07002 सिकंदराबाद- श्री साईनगर शिर्डी द्वी- साप्ताहिक विशेष गाडी ता. 4 डिसेंबर पासून सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवार आणि रविवारी दुपारी 16.45  वाजता सुटेल, विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोल मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सकाळी 09.10 वाजता पोहोचेल.

 नांदेड : हैदराबाद- जयपूर, सिकंदराबाद- शिर्डी, काकिनाडा- शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : गाडी संख्या 07020 हैदराबाद -जयपूर साप्ताहिक विशेष गाडी मार्गे औरंगाबाद ता. पाच  डिसेंबरपासून दर शनिवारी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी 15.10 वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड  मार्गे जयपूर येथे सकाळी 05.25 वाजता पोहोचेल.


गाडी संख्या 07019 जयपूर- हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी मार्गे औरंगाबाद ता. 08  डिसेंबर पासून दर मंगळवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी 15.20 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड  मार्गे हैदराबाद येथे सकाळी 07.30 वाजता पोहोचेल.


गाडी संख्या 07002 सिकंदराबाद- श्री साईनगर शिर्डी द्वी- साप्ताहिक विशेष गाडी ता. 4 डिसेंबर पासून सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवार आणि रविवारी दुपारी 16.45  वाजता सुटेल, विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोल मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सकाळी 09.10 वाजता पोहोचेल.


गाडी संख्या 07001 श्री साईनगर शिर्डी – सिकंदराबाद द्वी-साप्ताहिक विशेष ही गाडी ता. 5 डिसेंबर रोजी श्री साईनगर शिर्डी  रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी आणि सोमवारी सायंकाळी 17.20 वाजता सुटेल आणि औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीर मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी 08.55 वाजता पोहोचेल.


गाडी संख्या 07206 काकिनाडा- श्री साईनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक विशेष ही गाडी काकिनाडा रेल्वे स्थानकावरून ता. 5 डिसेंबर पासून दर सोमवारी बुधवार आणि शनिवारी सकाळी 06.00 वाजता सुटेल, राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबाद मार्गे श्री साईनगर शिर्डी सकाळी 09.10 वाजता पोहोचेल.

हेही वाचा - समस्यांच्या गर्दीत हरवलेले बसस्थानक, प्रवेशासाठी ज्येष्ठ - दिव्यांगांनाही करावी लागते तारेवरची कसरत -

 गाडी संख्या 07205 श्री साईनगर शिर्डी - काकिनाडा-त्रि-साप्ताहिक विशेष ही गाडी  श्री साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून दर ता. 6 डिसेंबर पासून दर मंगळवार- गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी 17.20 वाजता सुटेल, औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे काकिनाडा येथे रात्री 19.45 वाजता पोहोचेल.


गाडी संख्या 02765- तिरुपती- अमरावती द्वी साप्ताहिक उत्सव विशेष ही गाडी तिरुपती येथून दर मंगळवारी आणि शनिवारी सुटेल. या गाडीला ता. एक डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे.  ही गाडी ता.1 डिसेंबर पासून तिच्या बदलेल्या वेळे प्रमाणे धावेल. ही गाडी ता. 1 डिसेंबर पासून तिरुपती येथून दुपारी 15.40 वाजता सुटेल आणि काचीगुडा-04.00 , निझामाबाद-06.50, नांदेड -08.51, पूर्णा-09.40, अकोला-13.45 मार्गे अमरावती येथे दुपारी 15.10 वाजता पोहोचेल
08 . गाडी संख्या 02766- अमरावती ते तिरुपती द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी : ही गाडी अमरावती येथून दर सोमवारी आणि गुरुवारी  सुटेल. या गाडीला ता. 3 डिसेंबर ते 31  डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे.  ही गाडी ता. 3 डिसेंबरपासून अमरावती येथून बदलेल्या वेळेनुसार सकाळी 06.45 वाजता सुटेल, अकोला-08.20, पूर्णा-11.50, नांदेड -12.25, निझामाबाद-14.25, काचीगुडा-17.50, मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी  सकाळी 06.25 वाजता पोहोचेल..