Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Transformer Electrocution : वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितल्यानंतर महादेव रोहित्रावर चढले; मात्र वायर जोडत असताना अचानक वीज सुरू झाल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेनंतर महादेव यांचा मृतदेह काही तास रोहित्रावरच लटकलेल्या अवस्थेत होता.
Senagaon Farmer Dies While Repairing Transformer

Senagaon Farmer Dies While Repairing Transformer

esakal

Updated on

रोहित्रावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने विजेच्या तीव्र धक्क्याने ३३ वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे रविवारी (२० सप्टेंबर) सकाळी नऊच्या सुमारास घडली. महादेव पोहकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर त्यांचा मृतदेह तब्बल काही तास रोहित्रावरच लटकलेल्या अवस्थेत होता. या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com