हिंगोलीला पुन्हा हादरा : नव्याने बारा जणांना कोरोनाची लागण, दोघांचा मृत्यू

राजेश दारव्हेकर
Thursday, 23 July 2020

दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. 

हिंगोली :  जिल्हांतर्गत बुधवार (ता. २२) रात्री प्राप्त अहवालानुसार नव्याने १२ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत, आणि दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. 

हिंगोली येथील श्रीनगर  भागातील ३८ व ३२ वर्षीय पुरुष कोरोना रुणाच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. तसेच रिसाला बाजार येथील २० व, २७ वर्षीय पुरूष राजस्थानमधुन आले आहेत. तर २२ वर्षीय पुरुष पुणे येथून आले आहे. हिंगोलीतील मस्तानशहानगर येथील ३० वर्षीय स्त्री मुंबई येथून आली आहे. तर तलाबकट्टा येथील ४५ वर्षीय पुरुष बिड येथून आला आहे.

नव्याने दोन रुग्णाचा मृत्यु झाला आहे

वसमत तालुक्यातील पारडी येथील ५० वर्षीय स्त्री, ४० वर्षीय पुरुष कोरोना रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. तसेच शिवाजीनगर येथील     ५५ वर्षाचा पुरुष ५० वर्षाची स्त्री आय.एल.आय ( ताप, सर्दी, खोकला ) असल्यामुळे कोरोना तपासणी करण्यात आली असुन पॉझिटीव्ह आले आहेत. तर हिंगोली तालुक्यातील कन्हेरगाव नाका येथील २५ वर्षीय पुरुष तो मुंबई येथून आला आहे. 
दरम्यान, हिंगोली येथील आझम काॅलनीतील ३५ वर्षीय पुरुष तसेच मंगळवारा येथील ५५ वर्षीय पुरुषांचा मृत्यु झाला आहे. बुधवारी (ता. २२) रात्री      कोरोना केअर सेंटर वसमतअंतर्गत एक कोरोना रुग्ण ( स्टेशन रोड ), जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील तीन ( दोन तलाबकट्टा, एक गवळीपुरा ) बरे     झाल्यामुळे अशा प्रकारे चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र पुन्हा कोरोनाचे १२ रुग्ण नव्याने आढळुन आले आहेत. चार कोरोना रुग्ण बरे   झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व नव्याने दोन रुग्णाचा मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे एकुण ४५२ रुग्ण झाले आहेत

कालपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकुण ४५२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ३२७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. व आज     घडीला एकूण १२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पाच कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे. कोरोना केअर सेंटर औंढा येथे एक कोरोना रुग्ण ( अंजनवाडी ) उपचारासाठी भरती आहे. 

हेही वाचामरखेल ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा

जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे ३० कोरोना रुग्ण

आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे ३० कोरोना रुग्ण ( एक रिसाला, एक जि.एम.सी.नांदेड ( आझम कॉलनी ), एक धुत औरंगाबाद ( ब्राम्हण गल्ली वसमत ) , एक पेडगाव, नऊ शुक्रवार पेठ, एक नवलगव्हाण, एक पेन्शनपुरा, एक अंजनवाडी, तीन सेनगाव, एक जयपुरवाडी, एक नवा मोंढा, दोन कासारवाडा, दोन आझम कॉलनी, एक पलटन, एक नारायणनगर, एक अशोकनगर, एक श्रीनगर, एक पंचशीलनगर वसमत ) 

कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये २० कोरोना रुग्ण 

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये २० कोरोना रुग्ण ( दोन स्टेशन रोड, पाच सम्राटनगर, एक गणेशपेठ, एक पारडी ,एक गुलशननगर ( नांदेड येथे संदर्भात ), एक बहिर्जीनगर, एक स्वानंद कॉलनी ( नांदेड येथे संदर्भात ), दोन अशोकनगर, एक शिरळी, एक पळसगाव , दोन पारडी, दोन शिवाजी नगर येथील रहिवासी आहेत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुण १७ कोरोना रुग्ण ( तीन आखाडा बाळापुर ( नांदेड संदर्भात ), दोन कांडली, एक रेडगांव, सहा भाजीमंडी, पाच जि. प. हिंगोली येथील रहिवासी आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत ४७ कोरोनाचे रुग्ण ( १४ पेडगाव, पाच रामादेऊळगाव, दोन पहेणी, एक माळधामणी, ११ तलाबकट्टा, सात खडकपुरा, एक कनेरगाव नाका, दोन श्रीनगर, एक मस्तानशहानगर, दोन रिसाला बाजार, एक गायत्री नगर उपचारासाठी भरती आहेत. 

आज रोजी ४३० अहवाल येणे स्वॅब घेणे प्रलंबित आहे

कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे पाच कोरोनाचे  रुग्ण ( एक बस स्टॅन्डजवळ, तीन बालाजीनगर, एक वार्ड नं. १० समतानगर ) उपचारासाठी भरती आहे. हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकूण ६७७४ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ५९४४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ५८२० व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ९२७ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी ४३० अहवाल येणे स्वॅब घेणे प्रलंबित आहे. पाच कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

संपादन -  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli shaken again: Twelve newly infected with corona, two dead hingoli news