हिंगोलीत शिंदे गटाची आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Santosh Bangar

हिंगोलीत शिंदे गटाची आज बैठक

हिंगोली : शिवसेनेचा (शिंदे गट) मुंबई येथे दसरा मेळावा होणार आहे. त्याच्या पूर्वनियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता. एक) सकाळी नऊ वाजता बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी दसरा मेळाव्यानिमित्त मुंबई येथे हिंगोली जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

त्यानिमित्त पूर्व नियोजन बैठक शनिवारी होणार आहे. जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, हिंगोली, कळमनुरी, औंढा सर्व तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.