हिंगोली : सेनगाव येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

विठ्ठल देशमुख
Sunday, 13 December 2020

शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन, अनिल अगस्ती, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर उपतालुकाप्रमुख पिंटू गुजर,युवा सेना तालुका प्रमुख जगदीश  गाढवे, शिवसेना शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, युवा सेना शहर प्रमुख संतोष गाढवे, सर्कल प्रमुख बि,आर नायक, सोशल मीडिया प्रमुख सचिन जाधव यांच्यासह संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या  होणाऱ्या वाढीचा निषेध व्यक्त केला.

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करीत आहेत या प्रकरणी संतप्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला आहे. तसेच केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या पेट्रोल- डिझेल वाढीबाबत शनिवारी (ता.१२) निषेध करण्यात आला.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन, अनिल अगस्ती, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर उपतालुकाप्रमुख पिंटू गुजर,युवा सेना तालुका प्रमुख जगदीश  गाढवे, शिवसेना शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, युवा सेना शहर प्रमुख संतोष गाढवे, सर्कल प्रमुख बि,आर नायक, सोशल मीडिया प्रमुख सचिन जाधव यांच्यासह संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या  होणाऱ्या वाढीचा निषेध व्यक्त केला. सध्या कोवीड-१९ या महामारी मधून नुकतेच संपूर्ण जग सावरत असताना केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीची मनमानी चालूच आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

हेही वाचा -  हिंगोली : बिजभांडवल योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

केंद्रात भाजपचे सरकार असून भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य बोलताहेत या प्रकाराचा  निषेध नोंदवित संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी श्री दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी तहसील कार्यालयाकडे शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Shiv Sena burns the statue of Raosaheb Danve at Sengaon hingoli news