Hingoli : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलवर धडकला मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

Hingoli : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलवर धडकला मोर्चा

औंढा नागनाथ : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी (ता. २२) तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टीच्या अनुदानातून औंढा तालुका वगळण्यात आला तो समाविष्ट करावा, विमा कंपनीने पीक विमा भरपाई पोटी २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. कोरोनाच्या काळात मृत पावलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बसस्थानकापासून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकताच तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, माजी आमदार संतोष टारफे, शेतकरी नेते अजित मगर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, सहसंपर्क प्रमुख सुनील काळे, गोपू ऊर्फ अजय पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, जिल्हा संघटक, ॲड रवी शिंदे, ज्ञानेश्वर झटे, गणेशराव देशमुख, राजाभाऊ मुसळे, बंडू चोंढेकर, मधुकर गोरे, बबन ईघारे आदी सहभागी झाले होते.

मोदी सरकार शेतकरी विरोधी

माजी खासदार सुभाष वानखेडे म्हणाले की, ‘‘मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. राज्य शासन हे कुंभकर्णाच्या झोपेत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला. नांदेड जिल्ह्यात पीक विमा मिळतो तर हिंगोली जिल्ह्यावर अन्याय का?’’

गतवर्षी अतिवृष्टी झाली होती, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सर्वे झाल्याच्या तिसऱ्या दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले होते. आता काय परिस्थिती आहे. फक्त घोषणा केल्या जातात. परंतु, अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत.

-डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी सहकारमंत्री

Web Title: Hingoli Shiv Sena Thackeray Group Tehsil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..