esakal | हिंगोली : 11 लाखाच्या मुद्देमालासह सहा चोरटे जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सहा अट्टल गुन्हेगार १० लाख ८१ हजार ६०० रुपयाच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले  असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतर्फे शुक्रवारी ता. २३ देण्यात आली.

हिंगोली : 11 लाखाच्या मुद्देमालासह सहा चोरटे जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून रात्रीच्या व दिवसाच्या घरफोडयाचे गुन्हे घडले असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा वर्षांपासून सतत घरफोडी करणारे सहा अट्टल गुन्हेगार १० लाख ८१ हजार ६०० रुपयाच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले  असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतर्फे शुक्रवारी ( ता. २३) देण्यात आली.

जिल्ह्यात बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत वरुडतांडा येथे सप्टेंबर महिन्यात ता. चार रात्रीची घरफोडी झाल्याणे व सदर घरातून सोन्या चांदीचे दागीणे व नगदी रूपये व मोबाइल चोरी गेल्याने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी एक पथक स्थापन केले. सदर पथकात पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे तसेच बालाजी बोके, विलास सोनवणे,  संभाजी लकूळे, विठ्ठल कोळेकर, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे व जयप्रकाश झाडे यांची नेमणुक केली सदर पथकाने तपासाचे चक्रे गतीने फिरवून सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. 

हेही वाचा -  परभणी : पिक कर्जासाठी शेतकऱ्याचे बँकेत धरणे आंदोलन 

हे आहेत आरोपी

आरोपीतांमध्ये गोविंद सूर्यवंशी, संतोष पुणकेवार दोघे रा. नांदेड, राहुल खानजोडे रा. हिंगोली, अनिल महादेव भोसले, राजु भोसले शंकर उर्फ टिल्या भोसले तीघे  रा.पुर्णा सध्या वास्तव्यास असलेल्या नांदेड येथील हिंगोली गेट, रेल्वे पट्रीजवळील उड्डान पुलाखालील छापा मारून ताब्यात घेण्यात आले.

हिंगोली जिल्हयात आखाडा बाळापुर हद्दीतील घरफोडी

सदर छाप्या दरम्यान त्यांचे सोबत चोरी करणारे पाच इसम बाजुलाच असलेल्या लोखंडी पट्यांचे ॲगलवरून उडया मारून रेल्वे पट्रीने पळून गेले. सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे त्यांना विश्वासात घेउन विचारपूस केली असता त्यांनी हिंगोली जिल्हयात आखाडा बाळापुर हद्दीतील तोंडापुर, वरूड तांडा व वसमत हद्दीत  शास्त्रीनगर, किन्होळा, खांडेगांव, टाकळगांव येथे चोरी केली असल्याचे कबुल केले. सदर ठिकाणी चोरी करण्यासाठी जातांना आरोपी गोविंद सूर्यवंशी यांचा अँटो कमांक (एम.एच .२६ बी.डी. २९१६) व इतर एक प्रवासी अँटोचा वापर केल्याचे सांगीतले. सदर आरोपीतांकडून एक बजाज कंपनीचा अॅटो रिक्षा व चोरीतील गेला माल सोन्या चांदीचे दागीणे असा एकूण १०,८१,६००  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे