Hingoli : हिंगोलीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ५००० ते ६४११ रुपये दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli
हिंगोलीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ५००० ते ६४११ रुपये दर

हिंगोलीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ५००० ते ६४११ रुपये दर

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात सोमवार (ता.१५) ते शनिवार (ता.२०) या कालावधीत सोयाबीनची ६ हजार ३४० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ५००० ते कमाल ६४११ रुपये, तर सरासरी ५७०५ रुपये दर मिळाले. सोयाबीनचे किमान दर पाच हजार रुपये तर कमाल दर सहा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. दरात सुधारणा होत असल्यामुळे बाजार भावातील तेजीच्या आशेने सोयाबीनची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

शनिवारी (ता.२०) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ५८०० ते कमाल ६४११ रुपये, तर सरासरी ६१०५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.१९) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असतांना प्रति क्विंटल किमान ५८०० ते कमाल ६ हजार २९० रुपये, तर सरासरी ६ हजार ४५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१८) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ५१५० ते कमाल ६३०० रुपये, तर सरासरी ५७२५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.१७) सोयाबीनची १००० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ५५०० ते कमाल ६०५० रुपये, तर सरासरी ५७७५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.१६) सोयाबीनची १३५० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ५५०० ते कमाल ५८०० रुपये, तर सरासरी ५६५० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.१५) सोयाबीनची ११९० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ५००० ते कमाल ५६०० रुपये, तर सरासरी ५३०० रुपये दर मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top