हिंगोली : सोयाबीनने केला घात, पण पपईने दिली साथ

विठ्ठल देशमुख
Monday, 7 December 2020

सेनगाव तालुक्यात झालेल्या यंदाच्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास निसर्गाने हेरावून घेतला. येथील शेतकरी संतोष नागरे यांच्याकडे सहा एक्कर शेती असून पाच एकरात सोयाबीन पिक होते.

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : अतिवृष्टिमुळे सोयाबीन पिक नाहीसे झाले. मात्र परिस्थितीवर मात करून एका तरुण शेतकऱ्याने एक एकरात पपईची लागवड करून स्वतः बाजारात विक्री करीत आजच्या तरुणा समोर आदर्श निर्माण केला आहे. 

सेनगाव तालुक्यात झालेल्या यंदाच्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास निसर्गाने हेरावून घेतला. येथील शेतकरी संतोष नागरे यांच्याकडे सहा एक्कर शेती असून पाच एकरात सोयाबीन पिक होते. मात्र परतीच्या पावसामुळे या पाच एकरातील सोयाबीन पिक पूर्णतः नष्ट झाले. आणि नागरे यांची आर्थिक घडी विस्कटली. परंतु  त्यांनी खचून न जाता परिस्थितीवर मात करून हाताश न होता. नातेवाईकांकडे जाऊन पपईच्या लागवडीची माहिती घेतली. उधार उसनवार करून पपईचे रोप सुध्दा विकत घेतले. आणि आपल्या उर्वरित एका एकरामध्ये पपईच्या एक हजार झाडांची लागवड केली. त्याला रोज पाणी घालुन वेळोवेळी विविध औषधांची फवारणी करून झाडांची योग्य पद्धतीने सोय घेऊन रात्र अन दिवस मेहनत घेतली. सहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर या झाडांना फळेही मोठ्या प्रमाणात लागली. या पपईच्या फळाना पेपरमध्ये पॅकिंग करून तालुक्यातील विविध बाजार पेठेत आपल्या दुचाकीवर घेऊन विक्री केली जात आहे. आता पर्यंत या पपईच्या झाडांची लागवड करण्यासाठी एक लाख रुपये खर्च आला असून त्यातून पावने दोन लाखांचे उत्पादन घेतल्याचे संतोष नागरे यांनी सांगितले. 

हेही वाचा  नांदेड : तीन दुचाकी चोरांना अटक, दागिणे व दुचाकीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त- शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी -

पपईची विक्री सुरु असून अजूनही दोन ते अडीच लाखापर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता योग्य खबरदारी घेऊन पेपरमध्ये पपईची पॅकिंग केली जाते. त्यानंतरच बाजारात विक्रीला नेन्यात येते. नागरे यांच्या पपईला आता परिसरातुन मागणी वाढत चालली आहे. यामुळे संतोष नागरे यांची शेतीतुन जोडधंद्याकडे वाटचाल करून आजच्या तरुणांसमोर प्रेरणादायी ठरत असल्याचे पहायला मिळत आहे. माणूस करायला गेला तर काहीही अश्यक्य नाही हे सिद्ध करून दाखवलं आहे.

सहा एकर जमीन पैकी चार एकरामध्ये सोयाबीन पिक होते. त्याचे नुकसान झाले नंतर पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला  एका  एकरात त्याची लागवड केली. सहा महिन्यात ही झाडे मोठी झाली. या पपईच्या उत्पादनातुन आतापर्यंत पावनेदोन लाख रुपये मिळवले. पुढे सुध्दा दोन ते तीन लाखापर्यंत उत्पादन घेता येईल अशी आशा आहे.

- संतोष नागरे (शेतकरी) 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Soybeans did not income, but papaya did income hingoli news