esakal | हिंगोलीत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोलीत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

हिंगोलीत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना दिले आहेत.

जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना सूचना दिल्या आहेत तसेच गणेश मंडळांना देखील आवाहन केले आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे ठाणेदार यांनी लक्ष द्यावे तसेच गणेश मंडळांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे गणेश मंडळाच्या ठिकाणी कठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत या परिसरात जुगार अड्डे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल . त्यासाठी गणेश मंडळांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा: देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही

जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ररात्रीच्या वेळी गस्त राहणार आहे . तसेच पेट्रोलिंग साठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना श्री. कलासागर यांनी दिल्या आहेत. शासनाने गणेशोत्सवाच्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे . तसेच कोविडच्या नियमांचे ही पालन करण्याच्या सूचना श्री. कलासागर यांनी दिल्या आहेत . दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी . पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील याकडे संबंधित ठाणेदारांनी लक्ष द्यावे, गणेश उत्सवात मूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणूक काढता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

loading image
go to top