esakal | हिंगोली : अवैध वाहतूक वाढल्यामुळे एसटीला भुर्दंड 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार महामंडळाच्या बसस्थानक व आगाराच्या दोनशे मीटर परिसरातून अवैध वाहतूक होता कामा नये असे आदेश व नियम आहेत. सदरील आदेश हिंगोली येथे अवैध प्रवासी वाहतूक पायदळी तुडवीत आहेत. त्यात आरटीओ विभाग व  वाहतूक शाखा जबाबदार ठरत आहे. तसेच एसटीतील अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

हिंगोली : अवैध वाहतूक वाढल्यामुळे एसटीला भुर्दंड 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील महामंडळाच्या आगाराच्या २०० मीटर परिसराच्या आतच मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक फोफावली आहे. बसस्थानकाच्या भिंतीला खेटूनच व गेट पासून अवैध वाहतूकदार आपली वाहने भरून अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. या प्रकारामुळे एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी होत असल्याचे चित्र आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार महामंडळाच्या बसस्थानक व आगाराच्या दोनशे मीटर परिसरातून अवैध वाहतूक होता कामा नये असे आदेश व नियम आहेत. सदरील आदेश हिंगोली येथे अवैध प्रवासी वाहतूक पायदळी तुडवीत आहेत. त्यात आरटीओ विभाग व  वाहतूक शाखा जबाबदार ठरत आहे. तसेच एसटीतील अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या संक्रमान काळाने एसटीची चाके रुतून बसली. आता एसटी रस्त्यांवर धावत असली तरी हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आगाराची ग्रामीण बससेवा अद्यापही सुरू झालेली नाही. याचा फायदा दिवाळी सणात अवैध व खाजगी वाहतूकदार करून घेत आहेत.  सर्व नियम धाब्यावर बसवून वाहतूक केली जात असून पूर्वीप्रमाणे आपल्या वाहनात प्रवासी कोचून, दाबून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केली जात आहे. दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. 

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली की काय इतपत परिस्थिती उद्भवलेली आहे. या परिस्थितीत अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक व वाहनधारक कोणतीही खबरदारी घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे कोरणाची संख्या वाढण्याचीच भीती अधिक आहे. अवैध प्रवासी वाहनधारक आपल्या वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करत असून सर्वांचेच याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे