esakal | हिंगोली : तळणी गावाने माझा गाव माझी जबाबदारी या उपक्रमातंर्गत कोरोनाला रोखले

बोलून बातमी शोधा

तळणी जिल्हा हिंगोली
हिंगोली : तळणी गावाने माझा गाव माझी जबाबदारी या उपक्रमातंर्गत कोरोनाला रोखले
sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये कोरोनाच्या पाश्वभूमिवर निर्जंतुकीकरणासाठी औषधाची फवारणी करण्यात आली आहे. माझं गांव माझी जबाबदारी म्हणून कोरोनाला गावातुन हद्दपार ठेवण्यासाठी तळणी ग्रामपंचायतकडून हा उपक्रम राबवला जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून तळणी ग्रामपंचायतचे सरपंच राम कोरडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीमध्ये पाणी शुध्दकरण्याकरीता पावडर टाकुन ग्रामपंचायत स्तरावर योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

सध्या सेनगाव तालुक्यातील १२ गावांना कोरोना हॉटस्पॉट ठरत आहेत. तर अनेक ठिकाणी रुग्ण संख्या वाढत चालली असताना कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूचा संसर्ग आपल्या गावात होवु नये याकरिता तळणी ग्रामपंचायतीने मात्र माझं गांव माझी जबाबदारी स्विकारत वेळोवेळी केलेल्या उपाय योजना मुळे आतापर्यंत गावात एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे मत उपसरपंच समाधान खंदारे यांनी व्यक्त केले आहे.

यासह वार्ड एकमधिल रस्त्यावर येणार्‍या सांडपाणी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाली सफाईचे काम करुन त्याठिकाणी निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी करुन सदस्य अमोल खंदारे यांनी गावकऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी ग्रामपंचायत सेवक गोपाल कोरडेसह भारत खंदारे, परमेश्वर खंदारे, शुभम कोरडे, विनोद खंदारे, दत्ता चातुर, पवन खंदारे आदीची उपस्थिती होती. माझं गांव माझी जबाबदारी म्हणून कोरोनाला गावाच्या वेशीवर ठेवण्यासाठी येथील ग्रामस्थांचा सुध्दा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे