esakal | हिंगोली : सोमवारी खादीच्या कपड्यावरील डिस्काउंटचा अखेर, २० टक्के सुट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महात्मा गांधी जयंतीपासून दरवर्षी खादी भांडारातर्फे खादीच्या कपड्यावर वीस टक्के सुट दिली जाते. खादीचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार व्हावा हा या मागचा उद्देश आहे.  दरम्यान खादीच्या कपड्यात पुर्वी एकाच रंगाचा वापर असल्याने याकडे युवकाचे दुर्लक्ष होत असे वयस्कर मात्र त्याचा वापर करीत असत. 

हिंगोली : सोमवारी खादीच्या कपड्यावरील डिस्काउंटचा अखेर, २० टक्के सुट

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील रामलीला मैदानावर असलेल्या खादी भांडारात महात्मा गांधी जयंतीपासुन दिवाळीपर्यंत खादीच्या कपड्यावर वीस टक्के डिस्काउंट देण्यात आली होती. सोमवारी (ता. १६) त्याचा अखेरचा दिवस असल्याचे खादी भांडारातर्फे स़ांगण्यात आले आहे.

महात्मा गांधी जयंतीपासून दरवर्षी खादी भांडारातर्फे खादीच्या कपड्यावर वीस टक्के सुट दिली जाते. खादीचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार व्हावा हा या मागचा उद्देश आहे.  दरम्यान खादीच्या कपड्यात पुर्वी एकाच रंगाचा वापर असल्याने याकडे युवकाचे दुर्लक्ष होत असे वयस्कर मात्र त्याचा वापर करीत असत. 

हेही वाचा - हिंगोली : अवैध वाहतूक वाढल्यामुळे एसटीला भुर्दंड 

परंतु खादी भांडाराने यात बदल करत रंगीबेरंगी कपडे, चेक्सचा वापर करुन रेडिमेड कपडे विक्रीस उपलब्ध केले तसेच खादीचा प्रचार देखील मोठ्या प्रमाणावर केला. त्यातच स्वदेशी भावना युवकात वाढीस लागल्याने खादीची मागणी देखील वाढीस लागली. त्याचा परिणाम खादीच्या विक्रीवर झाला. गांधी जयंतीपासुन खादीच्या कपड्यावरील दिलेल्या वीस टक्के डिस्काउंटचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. 

तसेच अधिकारी कर्मचारी देखील खादीचा वापर करीत असल्याने खादीची विक्री वाढली आहे. खादी भांडारातर्फे गांधी जयंती पासून दिवाळी पाडव्यापर्यत खादीच्या कपड्यावर दिलेली विस टक्के सुट सोमवारी संपत असल्याचे खादी भांडाराचे व्यवस्थापक गणेश कर्हाळे यांनी सांगितले तसेच खालीच्या कपड्यावरील डिस्काउंटचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे