esakal | हिंगोली : उपजिल्हाधिकारी २० तर तहसीलदार संवर्गातील २७ अधिकाऱ्यांच्या बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

औरंगाबाद विभाग, शासनाने काढले उशिराने आदेश

हिंगोली : उपजिल्हाधिकारी २० तर तहसीलदार संवर्गातील २७ अधिकाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : मागील आठवड्यात शासनाने तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असताना त्यापाठोपाठ आता शासनाने औरंगाबाद विभागातील उपजिल्हाधिकारी वीस तर तहसीलदार संवर्गातील २७ अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्याचे आदेश गुरुवारी (ता. एक) रात्री उशिराने काढले आहेत.

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने  २०- २१ या आर्थिक वर्षातील ज्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झाले तर काहींच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपजिल्हाधिकारी संवर्गातून विभागातील वीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून केवळ एका अधिकाऱ्याची बदली झाली. यात हिंगोली येथील रोजगार हमी विभागाच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची नांदेड येथे रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना( ता. ३१) मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिल्याने तूर्तास तरी त्यांची बदली टळली आहे.

हेही वाचानवरात्रोत्सव सणानिमित्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी 

याशिवाय तहसीलदार संवर्गातील विभागातून २७ अधिकाऱ्यांच्या

बदल्याचे आदेश धडकल्याने हिंगोली जिल्ह्यातून तीन तहसीलदार यांची बदली झाली तर एकाची हिंगोलीत बदली झाली. यामध्ये हिंगोली येथील तहसीलदार गजानन शिंदे यांची नायगाव जि. नांदेड  येथे तर कळमनुरी येथील तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांची बिलोली जि. नांदेड येथे विनंतीवरून बदली झाली आहे. 

औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांची हिंगोली

तसेच औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांची हिंगोली येथील रिक्त झालेल्या जागेवर बदली करण्यात आली. मात्र अद्याप बदली ठिकाणी नवीन रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना ऑर्डर मिळाली नाही. आता तीन दिवस सलग सुट्या असल्याने सोमवारी( ता. पाच )ऑर्डर निघेल त्यानंतरच नवीन अधिकारी रुजू होतील.

संपादन - प्रल्हाद कांबळे