हिंगोली : कापूस आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली

कृष्णा ऋषी
Thursday, 10 December 2020

तात्कालीन शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कापसाला भाव वाढ मिळावी म्हणून आंदोलन झाले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना वीरमरण आले. गोळीबारात सुरवाडी येथील  ज्ञानदेव टोम्पे , डिग्रस येथील परसराम क-हाळे , निवृत्ती कऱ्हाळे या तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) : १९८६ साली कापूस आंदोलनामधील गोळीबारामध्ये वीरमरण पत्करलेल्या शेतकऱ्यांना औंढा तालुक्यातील सुरेगाव येथे गुरुवारी (ता. दहा)  सकाळी नऊ वाजता आदरांजली वाहण्यात आली. 

तात्कालीन शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कापसाला भाव वाढ मिळावी म्हणून आंदोलन झाले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना वीरमरण आले. गोळीबारात सुरवाडी येथील ज्ञानदेव टोम्पे, डिग्रस येथील परसराम क-हाळे, निवृत्ती कऱ्हाळे या तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. तर आंदोलनात सहभागी ५५ शेतकऱ्यांना कारावासाची शिक्षा झाली. शंभर पेक्षा अधिक शेतकरी गोळी लागल्याने जखमी झाले होते. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शेतमालाला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती .परंतु आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती. तेव्हा आणि आजही शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासाठी दर मिळवण्यासाठी झगडावेच लागत आहे. सुरेगावचे १९८६  मधील हे आंदोलन अंगावर शहारे आणणारे आहे. आंदोलनात गोळीबार केल्याने यात वीरमरण पत्करलेल्या तीन शेतकऱ्यांना आजही शेतकरी विसरू शकला नाही. दहा डिसेंबर रोजी या तीन वीरमरण आलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव येथे आदरांजली वाहण्यात आली. 

हेही वाचा  नांदेड : अर्धापुरात पुर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाचा फटका, एकहजार हेक्टरच्यावर शेतीला पाणी नाही -

यावेळी आमदार संतोष बांगर, ब. ल. तामस्कर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, उत्तमराव वाबळे, अँड. प्रदीप पोले, माधव पोले, गुलाब पाटील, सर्जेराव दिंडे, बाळासाहेब पोले, कानबाराव तात्या पोले, चंपतराव पोले, दत्ता शेगुकर , शंकर यादव, प्रभाकर पोले ,बाळू महाराज ,सखाराम पोले, मसाराव पोले, राधाकिसन मस्के, नागेश पोले, गुलाबराव पाटील, विजय मस्के, भागोराव पोले, बाळासाहेब चेअरमन पोले, विजय पोले, भाऊराव दिंडे, रामप्रसाद पोले, प्रज्योल पोले, गजानन पोले, संतोष पोले, शंकर सुरोशे, विकास पोले, भुजंग पोले, चंद्रकांत पोले, शिवाजी टोम्पे, राजू पाटील, संतोष पोले यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .यावेळी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गोरे ,डिगांबर दिघडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Tribute to the martyred farmers of the cotton movement hingoli news