
याबाबत माहिती अशी की वारंगा फाटा येथून जाणाऱ्या नागपूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग बायपासला दुचाकी व ट्रक चा भिषण अपघात होऊन चुंचा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
वारंगा फाटा ( जिल्हा हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथून जाणाऱ्या नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्ग बायपासवर ट्रक- दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) दुपारी घडली.
याबाबत माहिती अशी की वारंगा फाटा येथून जाणाऱ्या नागपूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग बायपासला दुचाकी व ट्रक चा भिषण अपघात होऊन चुंचा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या चूंचा येथील तुकाराम काळे वय ६० वर्ष, रावसाहेब लोमटे वय ४८ हे दोघे दुचाकीवरून वारंगाफाटा येथे येत होते. त्यांच्या पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी ९२८१ जोरदार धडक दिली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला .
हेही वाचा - विधायक बातमी : लोकसहभागातून तयार होणारा पुल पूर्णत्वाकडे एकीचे ज्वलंत उदाहरण
हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल ट्रकसोबत फरफटत दोनशे फुटापर्यंत गेली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, फौजदार हनुमंत नखाते, शेख बाबर, अर्षद पठाण, आदींनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी बाळापूर येथे पाठविण्यात आले आहे. या बाबत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मयत तुकाराम काळे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. तर रावसाहेब लोमटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
|
संपादन- प्रल्हाद कांबळे