हिंगोली : जिल्ह्यातील दोन लाख ७७८ शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाअभावी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळेना

राजेश दारव्हेकर
Monday, 14 December 2020

जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत एक  लाख सहा हजार १६० शेतकरी पात्र ठरणार आहेत . या सर्व शेतकन्यांची माहिती पोर्टलवर याअगोदरच अपलोड करण्यात आली आहे .

हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन २०१९ ची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकयांपैकी अजूनही दोन हजार ७७८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. 

जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत एक लाख सहा हजार १६० शेतकरी पात्र ठरणार आहेत. या सर्व शेतकन्यांची माहिती पोर्टलवर याअगोदरच अपलोड करण्यात आली आहे. शासनाकडून आलेल्या ग्रीन याद्यानूसार जिल्ह्यातील ९२ हजार ६९९ शेतकरी प्रत्यक्षात कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना आपल्या कर्ज खात्याला आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले होते. 

हेही वाचा हिंगोलीत शेतकरी विरोधी विधेयकाचा विद्यार्थी युवक काँग्रेसतर्फे निषेध

यातील याद्यानूसार ८९ हजार ९२१ शेतकऱ्यांनी आधार प्रत्यक्षात प्रमाणीकरण करुन घेतले आहे. यातील दोन हजार ७७८ शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील १४ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून ५२७ शेतकरी शिल्लक आहेत. वसमत तालुक्यातील २० हजार ८८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण तर ६७१ शेतकऱ्यांचे शिल्लक राहिले आहे. 

हिंगोली तालुक्यातील १९ हजार ४४९ शेतकऱ्यांचे पूर्ण, ५ ९९ शेतकन्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक राहिले आहे. कळमनुरी तालुक्यातील १६ हजार ९९५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून ४७४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे. व सेनगाव तालुक्यातील १७ हजार  ८४६ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून अजूनही ५०७ शेतकरी शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आधार प्रमाणीकरण होत नसल्याने कर्जमुक्तीच्या लाभाची प्रक्रिया पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ८९ हजार २०१ शेतकन्यांच्या खात्यावर ५८० कोटी २७ लाख ३५ हजार रुपये आत्तापर्यंत वर्ग करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याने त्यांना खरीप व रब्बी हंगामाचे कर्ज देखिल मिळण्यास सोईचे झाले.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Two lakh 778 farmers in the district did not get the benefit of debt relief scheme due to lack of Aadhaar certification hingoli news