Hingoli : उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणाऱ्याला धडा शिकवा : भास्कर जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

Hingoli : उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणाऱ्याला धडा शिकवा : भास्कर जाधव

हिंगोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करणाऱ्याला धडा शिकवा, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. शहरातील महात्मा गांधी चौकात सोमवारी (ता. १२) शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुदंडा, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, शिवसेना जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील, संदेश देशमुख यांच्यासह बाळासाहेब मगर, परमेश्वर मांडगे, उद्धव गायकवाड, अजित मगर, सुनील काळे आदींची उपस्थिती होती.

आमदार जाधव म्हणाले की ‘‘भाजपने शिवसेना तोडली, ४० आमदार बाजूला काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी करुन राज्याचा विश्वास घात केला आहे. यांना जनता कदापी माफ करणार नाही. आगामी येणाऱ्या निवडणुकीत हिंगोली जिल्हा भगवामय करायचा आहे, यासाठी जोमाने कामाला लागा.’’

‘ठरले आता मनाशी धोरण, जिल्ह्यात बांधा भगवे तोरण’

सहसंपर्क प्रमुख बबनराव थोरात म्हणाले, ‘‘येणाऱ्या सर्वच निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावायचाच आहे. यासाठी आपली ताकद दाखवून द्या, हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या विजयाचा जयजयकार व्हावा, ठरले आता. मनाशी धोरण, हिंगोली जिल्ह्यात बांधा भगवे तोरण.’’ माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुदंडा, माजी खासदार सुभाष वानखेडे, विनायक भिसे पाटील, संदेश देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी शहरात मेळाव्यासाठी आलेल्या मान्यवरांचे फटाक्यांची आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर रॅली देखील काढण्यात आली होती.

Web Title: Hingoli Uddhav Thackeray Betrayer Lesson Bhaskar Jadhav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..