
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथे काही दिवसापुर्वी दगावलेल्या कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या परिसरातील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंबड्या पशुसंवर्धन विभागाने नष्ट केल्या आहेत.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापुरनंतर याच तालुक्यातील पोतरा येथे शनिवारी ता.२३ अज्ञात रोगाने दोनशे कोंबड्या दगावल्याने खळबळ उडाली आहे.
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथे काही दिवसापुर्वी दगावलेल्या कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या परिसरातील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंबड्या पशुसंवर्धन विभागाने नष्ट केल्या आहेत. त्यानंतर येथून जवळच असलेल्या कृष्णापुर येथे देखील कोंबड्या दगावल्या आहेत. पिंपरी येथे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेट देऊन येथील १८७ कोंबड्या नष्ट केल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - जागतिक हस्ताक्षर दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी पांडुरंग चोपडे यांची धडपड?
दरम्यान आता हे लोन कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावापर्यंत पोहचले आहे. शनिवारी येथे दोनशे कोंबड्या अचानक दगावल्या आहेत. यात मारोती खराटे ४०, रामकिशन भुसनर ३०, गजानन मुलगीर ५५, चंद्रभान झुगंरे, आठ, शंकर रणवीर ३०, लक्ष्मण पवार ३०, सखाराम गायकवाड १३ अशा एकुण दोनशे कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने खळबळ उडाली आहे.
परभणी जिल्हानंतर हिंगोली जिल्ह्यात कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे यात कळमनुरी तालुक्यातील तीन गावात आतापर्यंत कोंबड्या दगावल्या आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे