हिंगोली : सवड येथे विद्युत रोहित्र दुरुस्त होऊन गावात येताच गावकऱ्यांनी काढली ढोलताशांच्या गजरात मिरवणूक

राजेश दारव्हेकर
Saturday, 2 January 2021

सतत जळणाऱ्या रोहित्रामुळे शेती पिकांना पाणी देण्यास अडथळा निर्माण हाेत असे. एका महिन्यांत तीनवेळा राेहित्र जळाल्याने रबीतील पीके धाेक्यात आली हाेती.

हिंगोली : तालुक्यातील सवड येथील शेतशिवारात बसविण्यात आलेले विद्युत राेहित्र सतत जळत असल्याने शेतकरी त्रस्त झाले हाेते. जळालेले रोहित्र दुरुस्त करुन दिल्यानंतर गावकऱ्यांना आंनद झाला यामुळे गावकऱ्यांनी  गावात ट्रॅक्टरमधून आलेल्या रोहित्राची शुक्रवारी ( ता. एक) ढोलताशांच्या गजरात गावात मिरवणूक काढली.

सतत जळणाऱ्या रोहित्रामुळे शेती पिकांना पाणी देण्यास अडथळा निर्माण हाेत असे. एका महिन्यांत तीनवेळा राेहित्र जळाल्याने रबीतील पीके धाेक्यात आली हाेती. यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी महावितरणे ठरवून दिलेले वीजबील वेळेत भरण्यात आल्याने लिंबाळा येथील महावितरणच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना काही दिवसांत विद्युत राेहित्र दिल्याने शेतकरी समाधान व्यक्त केले. तसेच हिंगाेली येथून सवड येथे विद्युत राेहित्र ट्रॅक्टरने दाखल हाेतात गावातून बँडताशांच्या गजरात शेतशिवारातील डीपीपर्यंत राेहित्र नेण्यात आले. राेहित्र बसवून पुन्हा रबी पिकांना पाणी देण्यास सुरूवात झाली. यामुळे येथील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

हेही वाचाहिंगोली : मागील वर्षात साडेचार हजार रक्तदात्यांनी केले रक्तदान 

याप्रसंगी रघुनाथ थोरात, गोविंद जावळे, सुग्राव पडोळे, मुंजाजी पडोळे, बापूराव जोजार, हनुमान पडोळे, सुभाष थोरात, श्रीराम रत्नपारखी, सुधाकर रत्नपारखी, मालजी थोरात, नामदेव पडोळे यांची उपस्थिती हाेती.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Villagers take out a procession to the sound of drums hingoli news

Tags
टॉपिकस
Topic Tags: