esakal | हिंगोली : अपंगत्व न स्विकारता मेहनत व जिद्दीच्या जोरावर प्रतिक्षा पुन्हा पहिल्यासारखी धावतेय
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिद्द,चिकाटी आणि मेहनत हे गुण अंगी असले की काहीच अशक्य नाही आणि आलेल्या संकटावर मातही करता येते हे सिध्द करून दाखवल आहे कडोळीच्या प्रतीक्षा देशमुख हिने हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथील अनिल भास्करराव देशमुख यांची प्रतीक्षा ही छोटी मुलगी पाचवी पासुनच धावपटु होती.

हिंगोली : अपंगत्व न स्विकारता मेहनत व जिद्दीच्या जोरावर प्रतिक्षा पुन्हा पहिल्यासारखी धावतेय

sakal_logo
By
सीताराम देशमुख

गोरेगाव (जिल्हा हिंगोली) : दोन्ही पाय निकामी झाल्यानंतर अपंगत्व न स्विकारता मेहनत व जिद्दीच्या जोरावर चार वर्षानंतर हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथील प्रतीक्षा पुन्हा पहिल्यासारखी धावु लागली आहे.

जिद्द,चिकाटी आणि मेहनत हे गुण अंगी असले की काहीच अशक्य नाही आणि आलेल्या संकटावर मातही करता येते हे सिध्द करून दाखवल आहे कडोळीच्या प्रतीक्षा देशमुख हिने हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथील अनिल भास्करराव देशमुख यांची प्रतीक्षा ही छोटी मुलगी पाचवी पासुनच धावपटु होती. प्रथम छोट्या स्पर्धानंतर प्रतिक्षाने जिल्हास्तरावर स्पर्धा गाजवल्या. अनिल देशमुख हे आपल्या ऊदरनिर्वाहा साठी  वाशिम येथे गेले  मुलींचे शिक्षण सुरु ठेवले.

हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात सोमवारपासून पोलिस दलाचे वार्षिक नियोजन, पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची उपस्थिती

जानेवारी २०१६ मध्ये  सांगली येथील मॅरॉथान स्पर्धेची जय्यत तयारीही तीने केली होती. यावेळी प्रतीक्षा वाशिम येथे सातवीत शिक्षण घेत होती. २०१६ जानेवारी (ता. १२) रोजी प्रतीक्षा गच्चीवर अभ्यास करत होती गच्चीवर माकड आल्याने ती घाबरुन पळाली व दुसऱ्या गच्चीवर ऊडी मारली. मात्र यामध्ये तीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. एका पायात स्टिल रॉडही टाकला. तब्बल एक वर्ष ती अंथरुणावर खिळून होती. नंतर पायातील रॉड काढल्यावर ती हळूहळू चालायला लागली. एवढी गंभीर दुखापत होऊनसुध्दा तिला धावण्याचे वेध लागले होते. आपण आता पुन्हा पहिल्यासारखे धावु शकु का असे ती सतत आपल्या आई वडिलास विचारत असे आई वडिल तीला समजाऊन सांगत की तु नक्कीच पुन्हा धावशिल दिड वर्षानंतर ती चालु लागताच तीने पुन्हा धावण्याचा सराव हळूहळू सुरु केला. हे करत असतांना तिला त्रासही व्हायचा मात्र तीने जिद्दीच्या जोरावर प्रयत्न सोडले नाहीत.

सध्या ती बारावीत शिकत असून धावण्याचा सराव कसून करत आहे. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये सांगली येथे होणाऱ्या मॅरॉथान स्पर्धेत भागही घेणार आहे. दोन्ही पाय निकामी झाल्यानंतर अपंगत्व न स्वीकारता मेहनत व जिद्दीच्या जोरावर चार वर्षानंतर प्रतीक्षा पुन्हा पहिल्यासारखी धावु लागली आहे. तीच्या या जिद्दीला तीचे वडील अनिल व आई संगीता यांनी सतत प्रोत्साहन दिले आहे. प्रतिक्षाचे वडील अनिल देशमुख छोटे मोठे काम करुन ऊदरनिर्वाह करुन आपल्या दोन मुलींचे संगोपन करतात. आई संगिता शिवणकाम करुन संसाराला हातभार लावते. प्रतीक्षा लहानपणापासुनच धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असे. २०१५ मध्ये ती नागपूर येथील स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातुन पहिली आली होती. मात्र झालेल्या अपघाताने ती खचुन न जाता मोठ्या जिद्द व मेहनतीने पुन्हा आपल्या पायावर धावत आहे. तीची ही कहानी निश्चितच सगळ्यासांठी प्रेरणादायी असून प्रतिक्षाच्या या जिद्दीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे