esakal | हिंगोलीला पुन्हा हादरा, एकाची भर, संख्या पोहचली १५ वर
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोलीला पुन्हा हादरा, एकाची भर, संख्या पोहचली १५ वर

 

हिंगोली : जिल्‍ह्यात बुधवारी (ता. २०) प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यातील एका २३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्‍पष्ट झाले. जिल्‍ह्यात आता १५ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची 
माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

हिंगोलीला पुन्हा हादरा, एकाची भर, संख्या पोहचली १५ वर

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्यात बुधवारी (ता. २०) प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यातील एका २३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्‍पष्ट झाले. जिल्‍ह्यात आता १५ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

बुधवारी (ता. २०) जिल्ह्यात कोरोना लागण झालेल्या १०० रुग्णापैकी ८५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आजघडीला १५ रुग्ण कोरोना बाधित असून बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एका २३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले आहे. तो मुंबई येथून हिंगोली जिल्‍ह्यात परतला असून वसमत येथील पॉझीटीव्ह रुग्णासोबत मुंबई येथे कामाला होता. त्‍याची प्रकृती स्‍थिर असून सद्यस्‍थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे डॉ. श्रीबास यांनी सांगितले. 

हेही वाचा -  लगीनघाई वधू पित्यासाठी वरदान तर व्यावसायिकांसाठी अवघड...
  
जिल्‍ह्यात १०० रुग्णांना कोरोनाची बाधा, ८५ ना सोडले घरी

वसमत येथे मुंबई येथून आलेले आठ जण या पुर्वी कोराना पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी परत एका २३ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्‍ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १५ वर गेली आहे. जिल्‍ह्यात एकूण १०० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील ८५ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्‍यान, सहा एसआरपीएफ जवानावर औरंगाबार येथील धुत हॉस्‍पीटल 
येथे उपचार सुरू आहेत. तर नऊ रुग्णावर वसमत येथे उपचार सुरू आहेत. बाहेर गावावरून आलेल्या नागरीकांनी चिंता वाढवीली असल्याचे चित्र आहे. 

तपासणी व औषधोपाचार केले जात रुग्णांची संख्या कमी

जिल्‍ह्यात नुकतीच बाधीतांची संख्या कमी होत असताना मुंबई येथून वसमत येथे आलेल्या व शासकिय क्‍वारंटाईन झालेल्या आठ जण एकाच दिवसी कोरोना पॉझीटीव्ह निघाले त्‍यात परत आता एकाची भर पडल्याने हा आकडा नऊवर गेला आहे. आरोग्य विभाग सतत आयसोलशन वार्ड व तालुक्‍याच्या ठिकाणी क्‍वारंटाईन सेंटरमध्ये सतत लक्ष ठेवून असून वेळोवेळी रुग्णाची तपासणी व औषधोपाचार केले जात रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आहे. त्‍यातच जिल्‍ह्यात सोशल डिस्‍टन्सचे पालन देखील होत 
आहे. नागरीक बाजारात जाताना मास्‍क किंवा रुमालाचा वापर करीत आहेत. 

येथे क्लिक करापूर्व सहमती मिळालेले शेतकरी अडचणीत...कशामुळे ते वाचा

बाहेर गावातून येणाऱ्यावर सतत लक्ष ठेवून

यासह प्रत्येक आस्‍थापना, विविध दुकानावर देखील सॅनिटाझरचा वापर केला जात आहे. नागरीक स्‍वतः देखील काळजी घेत आहेत. मात्र सध्या बाहेर जिल्‍ह्यातून येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढत असल्याने त्‍यांची चिंता मात्र जिल्‍हा वाशियांना लागली आहे. मात्र गाव पातळीवर नेमण्यात आलेल्या पथक बाहेर गावातून आलेल्याची आरोग्य तपासणी करून त्‍यांना क्‍वारंटाईन करीत आहेत. गावातील नागरीक देखील गावात बाहेर गावातून येणाऱ्यावर सतत लक्ष ठेवून आहेत.

loading image
go to top