हिंगोली : वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला, पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस

कृष्णा ऋषी
Saturday, 26 December 2020

तालुक्यातील  शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचा पेरा कल्याने  आता ही सर्व धान्य जमिनीच्या वर येऊन वाऱ्यावर डोलत असताना वन्य प्राणी हरिण, रोही रानडुक्कर  या प्राण्यांनी शेत शिवारामध्ये धुमाकूळ घालून रात्रीच्या वेळेला या पिकांची शेंडे खात आहेत

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) : तालुक्यामध्ये गहू हरभरा टाळके ज्वारी पिक बहरले असुन वन्यप्राणी त्याची नासाडी करीत असल्याने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यातील  शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचा पेरा कल्याने आता ही सर्व धान्य जमिनीच्या वर येऊन वाऱ्यावर डोलत असताना वन्य प्राणी हरिण, रोही, रानडुक्कर या प्राण्यांनी शेत शिवारामध्ये धुमाकूळ घालून रात्रीच्या वेळेला या पिकांची शेंडे खात आहेत. त्यामुळे शेतकरी वन्य प्राण्यांना वैतागला आहे. शेतकऱ्यांनी वारंवार वनविभागाला तोंडी व लेखी तक्रार करूनही वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांतुन  बोलल्या जात आहे.

हेही वाचा -  स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेट- २०२० परीक्षा दोन टप्प्यात -

 तालुक्यातील सिरला, कोडशी, गोजेगाव, केळी ,उंडेगाव, चिचोलीसिद्धेश्वर, जामगव्हाण, आमदरी, राजदरी, पिंपळदरी, औंढा नागनाथ, दुधाळातांडा, जवळाबाजार, नागेशवाडी काठोडा, अंजनवाडा महादेव, तुर्क पिंपरी, सुरेगाव,ढेगज, वडचुना, दुरचूना,गागलवाडी, सेंदुरसना, शिरड शहापूर, मार्डी, उमरा, सारंगवाडी, जांब, राजापूर, सुरवाडी, सुरेगाव , अजनवाडी, गोळेगांव, जडगाव, बोरजा, पिंपळा, असोला, काकाडदाभा, जलालदाभा आदी भागामध्ये वन्य प्राणी असल्यामुळे हे वन्य प्राणी शेतामध्ये जाऊन गहू हरभरा टाळके ज्वारी या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. एकीकडे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Wildlife infestation has increased, large scale destruction of crops hingoli news