esakal | हिंगोलीने मिळविला देशभरात मान, पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

देशपातळीवर नगर परिषदांसाठी चालू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या अभियानात नागरिकांनी दिलेला अभिप्राय या गटात हिंगोली नगर परिषेदेने पश्चिम विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हिंगोलीने मिळविला देशभरात मान, पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार वितरण

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : देशपातळीवर नगर परिषदांसाठी चालू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या अभियानात नागरिकांनी दिलेला अभिप्राय या गटात हिंगोली नगर परिषेदेने पश्चिम विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सर्वसाधारण गटात पश्चिम गटात कऱ्हाड नगर परिषदेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. हिंगोली नगर परिषदेने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यमान प्रशासकीय अधिकारी तथा ज्यांच्या कार्यकाळात हे काम झाले ते तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांचे प्रधानमंत्री आणि नगर विकास विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. हिंगोली नगरपालिका पुढेही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेईल, असे मुख्याधिकारी डॉ अजय कुरूवाडे यांनी सांगितले.

हेही वाचा Video ; बाजार समिती कर्मचारी मागण्यंसाठी एकवटले, का ते वाचा

स्वच्छ सर्वेक्षणानुसार गुणदान 
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशभरातील शेकडो नगर परिषदा सहभागी झाल्या आहेत. सहभागी झालेल्यापैकी पुरस्कारप्राप्त नगर परिषदांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम नवी दिल्लीत झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषदांना स्वच्छ सर्वेक्षणानुसार गुणदान करण्यात आले. 

सर्वसाधारण वर्गातून पश्चिम गटात प्रथम 
सर्वसाधारण वर्गातून पश्चिम गटातून नागरिकांनी दिलेला अभिप्राय या गटात हिंगोली नगर परिषदेने पश्चिम विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सर्वसाधारण गटात पश्चिम गटात कऱ्हाड नगर परिषदेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कऱ्हाड, लोणावळा, रत्नागिरी, बल्लारपूर, संगमणेर, शिरपूर-वरवडे, पंढरपूर, तळेगाव दाभाडे, भद्रावती, अमळनेर, हिंगोली, खोपोली, शहादा, उरण इस्लामपूर, उमरेड, शेंदवा, खामगाव, कोपरगाव, पेटलाड आणि सिन्नर. हिंगोली नगरपालिका पुढेही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेईल, असे मुख्याधिकारी डॉ अजय कुरूवाडे यांनी सांगितले.

यांना मिळाला मान
कऱ्हाड, लोणावळा, रत्नागिरी, बल्लारपूर, संगमणेर, शिरपूर-वरवडे, पंढरपूर, तळेगाव दाभाडे, भद्रावती, अमळनेर, हिंगोली, खोपोली, शहादा, उरण इस्लामपूर, उमरेड, शेंदवा, खामगाव, कोपरगाव, पेटलाड आणि सिन्नर. 

संपादन : राजन मंगरुळकर 

loading image
go to top