हिंगोली : जिल्ह्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे प्रगतिपथावर, ३७ कोटी खर्च अपेक्षित, दोन निवासस्थानाचा समावेश

राजेश दारव्हेकर
Thursday, 10 December 2020

दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर काही ठिकाणी नव्याने आरोग्य उभारले जात आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचणी येत होत्या ,तर काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्याने रुग्णांना पदर मोड करून जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याची वेळ येत होती.त्यामुळे रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली होती.

हिंगोली :  जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन गावात निवासस्थानचे काम प्रगतिपथावर असून यासाठी ३७ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर काही ठिकाणी नव्याने आरोग्य उभारले जात आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचणी येत होत्या ,तर काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्याने रुग्णांना पदर मोड करून जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याची वेळ येत होती.त्यामुळे रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व साधारण सभेत ठराव घेऊन ज्या गावात आरोग्य केंद्र नाहीत त्या ठिकाणी लोकसंख्येच्या अधारावरून प्राथमिक केंद्र तर मोडकळलीस आलेल्या ठिकाणी नवीन इमारती उभारण्यासाठी आरोग्य संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार  नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने त्यास मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा हिंगोली : वधू पित्याकडून वधूस आंदण म्हणून दिली ३१ फळझाडांची भेट, तेलगावच्या राऊत परिवाराचा उपक्रम

यामध्ये हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव, आडगाव औंढा तालुक्यातील जवळा बाजार कळमनुरी तालुक्यातील 

डोंगरकडा ,वाकोडी, मसोड तर सेनगाव तालुक्यातील भानखेडा , ब्रहम्वाडी यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींना प्रत्येकी पाच कोटी तर निवासस्थानसाठी ३ लाख ७२ हजारचा निधी उपलब्ध झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती व निवासस्थाना साठी एकूण ३७ कोटी निधीतून कामे केली जात आहेत. यामध्ये मसोड व वाकोडी याठिकाणी निवास्थान बांधकाम केले जात आहे हि कामे देखील अंतिम टप्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शिवाजी  पवार यांनी सांगितले. तर सहा प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतिपथावर असून डोंगरकडा येथील काम पूर्ण झाले आहे. तसेच भानखेडा व ब्रह्मवाडी येथे बृहत आराखड्यातून मंजूर झालेली कामे असून हि नव्याने केली जात आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा उभारल्या जाणार आहेत. ऑक्सिजन सिलेंडर सह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने रुग्णांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Work on six primary health centers in progress in the district, expected to cost Rs 37 crore, including two residences hingoli news