हिंगोली : योग शिबिराचे गावोगाव नियोजन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

हिंगोली : योग शिबिराचे गावोगाव नियोजन करा

हिंगोली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ता. २१ जून रोजी येथील पोलिस कवायत मैदानावर योग शिबिराचे आयोजन करावे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराच्या आयोजनाची पूर्व तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली.

त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, पोलिस विभागाचे अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, योगा शिक्षक लेकुळे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हास्तरावर पोलिस कवायत मैदानावर योग शिबिर घ्यावे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच पोलिस विभागाने समन्वयाने नियोजन करावे.

प्रत्येक तालुकास्तरावर तालुक्यातील गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी समन्वयाने योग शिबिराचे आयोजन करावे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरही संबंधित गावचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक यांनी समन्वयाने योग शिबिर घ्यावे. या शिबिरात शिक्षक, विद्यार्थी व गावातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे. ग्रामपंचायत स्तरावर दर शनिवारी योग शिबिरे घेण्यासाठी सूचना द्याव्यात. सदर शिबिराचा जास्तीत- जास्त नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी सर्व नगर पालिका, नगर पंचायतीने योग शिबिराच्या आयोजनाचे होर्डिंग लावून जनजागृती करावी.’

हिंगोलीत रॅली

२० जून रोजी हिंगोली शहरात रॅली काढून योग शिबिराची जनजागृती करावी. तसेच तालुकास्तरावर शिक्षकांसाठी येत्या शनिवारी व रविवारी योग प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाइन किंवा ऑफलाईन आयोजन करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: Hingoli Yoga Camp Village To Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top