Hingoli : जिल्हा परिषदेचे आरक्षण उद्या होणार निश्चित

तयारी निवडणुकीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
zp hingoli
zp hingolisakal

हिंगोली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाप्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, १९९६ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणांसह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे.

पंचायत समितीसाठी तहसील कार्यालयात बैठक

हिंगोली जिल्हा परिषदेसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव पंचायत समितीसाठी संबंधित तहसील कार्यालयात व वसमत पंचायत समितीसाठी वसमत येथील पंचायत समिती सभागृहात आरक्षण निश्चितीसाठी बैठक होणार आहे.

जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची आरक्षण निश्चितीच्या बैठकीस उपस्थित राहण्याची इच्छा आहे, त्यांनी दिलेल्या वेळेत हजर राहावे. जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आरक्षणाचे प्रारुप २९ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना २९ जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत सादर करता येतील.

- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com