हिंगोलीकर आनंदीत, कोरोना रुग्ण बरे होण्याचा ‘रिकव्हरी रेट’ राज्यात तिसरा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mukta

हिंगोली जिल्‍हा कोरोना आजाराचे रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये जिल्‍हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. यामुळे सतत वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येने घाबरलेल्या नागरिकांना या अहवालाने दिलासा मिळाला आहे.  

हिंगोलीकर आनंदीत, कोरोना रुग्ण बरे होण्याचा ‘रिकव्हरी रेट’ राज्यात तिसरा 

हिंगोली ः जिल्‍ह्यात मेट्रोसिटीतून आजपर्यंत ४६ हजार ५९१ नागरिक आले असून त्‍यांची सर्वांची वैद्यकीय अधिकारी, समुदाय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्‍वयंसेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. कोरोना आजाराचे रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये जिल्‍हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे बुधवारी (ता.२४) देण्यात आली आहे. यामुळे सतत वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येने घाबरलेल्या नागरिकांना या अहवालाने दिलासा मिळाला आहे.  

कोरोना आजाराची चिन्हे, लक्षणे आढळून आल्यास त्‍यांना शासकीय क्‍वारंटाईन करून त्याचे स्‍वॅब नमुने नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत होते. त्यानंतर अहवाल प्राप्त होण्याच्या आधीच जिल्हा आरोग्य विभाग या रुग्णांच्या उपचारावर लक्ष ठेवून होते. त्यांना योग्य उपचार मिळाल्याने अनेकांनी या आजारावर मात केली आहे. 

अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन 
जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ राधाबिनोद शर्मा यांनी कार्यक्षेत्रात प्रत्‍यक्ष भेटी देवून तेथील पाहणी करून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सीईओ श्री.शर्मा, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी कोरोना रुग्ण आढळलेल्या गावात प्रत्‍यक्ष भेटी देवून कंन्टेन्मेंट झोन व बफर झोन येथील भागात सर्वेक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वाधीक फटका.....कसा तो वाचा

२२४ जण बरे 
आरोग्य विभागातर्फे कोरोना आजाराबाबत कोरोना एक्‍सप्रेसद्वारे जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त गावात जाऊन जनजागृती करण्यात आली. आजपर्यंत जिल्‍ह्यात कोरोना आजाराचे २४८ व्यक्‍तींना लागण झाली असून त्‍यापैकी २२४ जण बरे झाल्याने त्‍यांना सुट्टी देण्यात आली आहे. बुधवारी (ता.२४) कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्‍यांची प्रकृती चांगली आहे. 

हेही वाचा - आमदार, खासदारांसह अनेकजण धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे यश 
जिल्‍ह्यात १००८ अंगणवाडी सेविका, ३७ गटप्रवर्तक, १२१४ अंगणवाडी कार्यकर्त्या, ५०३ आरोग्य कर्मचारी, ११९ समुदाय आरोग्य अधिकारी या सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे जिल्‍हा कोरोना विषाणू आजाराच्या ‘रिकव्हरी रेट’ मध्ये राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आल्याने जिल्‍हाधिकारी श्री. जयवंशी, सीईओ शर्मा यांनी जिल्‍ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्‍वयंसेविका अंगणवाडी कार्यकर्ती या सर्व अधिकारी या सर्वांचे अभिनंदन केले असल्याचे दिलेल्या पत्रात नमुद आहे. 

loading image
go to top