esakal | मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका.....कसा तो वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यात यंदा सुमारे चाळीस लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी होइल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. यानुसार पेरणीसाठी लागणाऱ्या सोयाबीन बियाणांची उपलब्धता महाबीजसह खासगी कंपन्यांनी केली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी घरचे बियाणेही पेरणीसाठी वापरले. राज्यात मृग नक्षत्रात पावसाचे आगमण झाल्यानंतर साधारणत: ता. दहा ते ता. बारा जूनपासून पेरणीला सुरवात झाली.

मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका.....कसा तो वाचा

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : राज्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या सर्वाधीक तक्रारी मराठवाड्यातून आल्या आहेत. यासोबतच विदर्भातुनही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दोन दिवसात राज्यातील नुकसानीचे क्षेत्र निश्चित सांगत येइल, अशी माहिती राज्याचे कृषी संचालक (गुण नियंत्रण) विजय घावटे यांनी दिली.

राज्यात चाळीस लाख हेक्टरवर पेरा
राज्यात यंदा सुमारे चाळीस लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी होइल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. यानुसार पेरणीसाठी लागणाऱ्या सोयाबीन बियाणांची उपलब्धता महाबीजसह खासगी कंपन्यांनी केली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी घरचे बियाणेही पेरणीसाठी वापरले. राज्यात मृग नक्षत्रात पावसाचे आगमण झाल्यानंतर साधारणत: ता. दहा ते ता. बारा जूनपासून पेरणीला सुरवात झाली. यानंतर राज्याच्या काही भागात पावसाचे प्रमाण बरे राहिल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरु ठेवली. पेरणीनंतर तीन-चार दिवसात सोयाबीनचे मोड दिसू लागतात. परंतु यंदा आठ दिवसानंतरही बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली. अनेक ठिकाणाहून हीच परिस्थिती समोर आल्याने बियाणात फसवणुक झाल्याचे लक्षात आले. 

हेही वाचा.....सोयाबीन बियाणे तक्रारीबाबत जिल्हाधिकारी बांधावर....कुठे ते वाचा

मराठवाडा-विदर्भातून सर्वाधिक तक्रारी
सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या मराठवाड्यातून सर्वाधिक तक्रारी सुरु झाल्या. कंपन्यांनी बोगस सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाइ देवून सदोष बियाणे विक्री करणाऱ्या कपंन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारी राज्यातील राजकीय पक्षांसह शेतकरी संघटना तसेच सामाजीक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्या आहेत. या तक्रारीनंतर तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती कृषी संचालनालयाकडून मिळाली. राज्यातील जिल्हानिहाय तक्रारीनुसार माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आजपर्यंत साडेचार हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी मराठवाड्यातून आल्या आहेत. तसेच विदर्भातही तक्रारी येत आहेत, अशी माहिती कृषी संचालक विजय घावटे यांनी ‘सकाळ’शी बोलतांना दिली. 

हेही वाचलेच पाहिजे....दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे द्यावे - खासदार चिखलीकर

दोन दिवसात नुकसान कळेल
सोयाबीन बियाणे मुळात नाजूक असते. बियाणे उगवत नसल्याच्या कारणात बियाणांची खराबी, कमी पाऊस, ट्रॅक्टरने झालेली खोल पेरणी या बाबी पुढे आल्याचे श्री घावटे यांनी सांगीतले. मागील वर्षी हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते, असेही ते म्हणाले. आगामी दोन-तीन दिवसात राज्यात बियाणांच्या तक्रारीची माहिती मिळेल. यातून नुकसानीबाबत सांगता येइल, असेही ते म्हणाले. 

सर्वाधिक तक्रारी मराठवाडा, विदर्भातून
सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी मराठवाडा व विदर्भातून आल्या आहेत. बियाणे न उगवण्याच्या कारणात बियाणांची खराबी, कमी पाऊस तसेच खोल पेरणी या कारणांचा समावेश आहे. आगामी दोन - तीन दिवसात राज्यातील तक्रारी कळतील.
- विजय घावटे,
कृषी संचालक (गुणनियंत्रण), पुणे. 

loading image
go to top