पाच हजाराची लाच घेताना हिंगोलीचा सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

राजेश दारव्हेकर
Tuesday, 19 January 2021

मंगळवारी ता.१९ पाच हजाराची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकार्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले .

हिंगोली :  सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाच्या फरकाच्या बिलाची छाननी करून शिक्षण अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन औरंगाबाद येथील उपसंचालक यांच्याकडे दाखल करण्यासाठी तक्रादाराकडून मंगळवारी (ता. १९) पाच हजाराची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

येथील सहाय्यक लेखाधिकारी भगवंत प्रशांत कपाळे भविष्य निर्वाह निधी पथक राहणार आनंदनगर यांनी वसमत येथील तक्रारदाराला सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाच्या फारकाच्या बिलाची छाननी करून शिक्षण अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन उपसंचालक यांच्याकडे दाखल करतो म्हणून पाच हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यानुसार तक्रारदार याने नेहमीच हा अधिकारी पैसे दे नाहीतर तुझे काम होणार नसल्याचे सांगत होता. अखेर तक्रारदाराने दोन दिवसांपूर्वी सहायक लेखाधिकारी भगवंत कपाळे यांनी पाच हजार लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस उपधीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने या प्रकाराची सत्यता पडताळणी केली असता यात पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे स्पस्ट झाले.

हेही वाचा - आता लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे, अर्धापूरातील 43 गावात लवकरच मिळणार नवीन कारभारी

त्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानाजवळ असलेल्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात पावणे दोनच्या सुमारास सापळा रचला होता. त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी यांनी काम करून देण्यासाठी  तक्रादाराकडून पाच हजार लाचेची रक्कम स्विकारताना पथकाने ताब्यात घेतले व लाच लुचपत कार्यालयात आणले, त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस उपधीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफूने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बुरकुले, उपरे, संतोष दुमाणे, महारुद्र कवाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे , विनोद देशमुख, अविनाश कीर्तनकार, प्रमोद थोरात यांच्या पथकाने कारवाई करून लाचखोर अधिकाऱ्यास ताब्यात घेतले.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli's assistant accountant caught by ACB while accepting bribe of Rs five thousand hingoli news