BAITHAK
BAITHAK

कामे पुर्ण न झाल्याने हिंगोलीचे जिल्हाधिकारी यंत्रणेवर संतापले

हिंगोली : यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे रोजगार हमी योजनेतील कामे रखडली आहेत. यंत्रणेने मन ओतून कामे न केल्याने आज ही परिस्थिती आहे. आतापर्यंत कामे व्हायला पाहिजे होती. ती प्रत्यक्षात न झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.२३) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या वेळी पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, भूसंपादन उपजिल्हाधिकारी गोविंद रनवीरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्यासह उपविभागीय अधिकारी, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, लघुसिंचन तालुका कृषी अधिकारी, लागवड अधिकारी आदी विभागप्रमुख उपस्थित होते. या वेळी प्रधान सचिव नंदकुमार यांनी देखील लेबर बजेटबाबत अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे मार्गदर्शन केले. 

लोकसंख्येनुसार आराखडा तयार करा 
जलयुक्त शिवार योजना शासनाने बंद केली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभागाने योजनेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. केवळ सहभागी नव्हे तर मन लावून कामे करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मग्रारोहयो अंतर्गत प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याची निवड झाली असून आता कामे करावी लागणार आहेत. बहुतांश कामे ही ग्रामपंचायतमार्फत होणार असल्याने तलाठी, ग्रामसेवक यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून कोणकोणती कामे घ्यावयाची आहेत ते सुचविण्यात यावेत. त्यानुसार गावातील मजुरांसाठी गावात कामे उपलब्ध करून कोणकोणती कामे करता येतील, तसेच या कामांचा व लोकसंख्येनुसार आराखडा तयार करून त्यात समावेश करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

गावांचा सर्वकष विकास आराखडा तयार करा
याशिवाय आदर्श गाव योजनेच्या धर्तीवर निवड करण्यात आलेल्या गावांचा सर्वकष विकास आराखडा तयार करून त्यामध्ये गावातील गरजा, तसेच भौतिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून गावाच्या विकासासाठी काय करता येईल या बाबींचा समावेश आराखड्यात करावा, गावात महिला सक्ष्मीकरणासाठी काय उपाययोजना करता येतील, भूमिहीन व शेतमजूर यांच्या उपजीविकाबाबत कामाचा समावेश करून कामे रोजगार हमीमार्फत उपलब्ध करून देणे आदींबाबत सूचना दिल्या. 

जलसाठा वाढण्यास मदत होईल याबाबत चर्चा  
उगम संस्थेचे जयाजी पाईकराव यांनी कयाधु नदीचे पुनर्वसन कसे करता येईल याबाबत प्रश्न उपस्थित करून पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीचे खोलीकरण, रुंदीकरण कामे हाती घेतली तर नदीपात्रात प्रदूषण होणार नाही, तसेच जलसाठा वाढण्यास मदत होईल याबाबत चर्चा करण्यात आली. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com