
हिंगोली येथील सनी पंडित यांने यापूर्वीही रणजी ट्रॉफी राज्यातील स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली आहे.
हिंगोली : येथील क्रिकेटपटू सनी पंडित यांची बडोदा येथे १० जानेवारीपासून होणाऱ्या मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
हिंगोली येथील सनी पंडित यांने यापूर्वीही रणजी ट्रॉफी राज्यातील स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली आहे. बडोदा येथे होणाऱ्या मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यासाठी राज्यभरातून ६० खेळाडू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांनी पुण्यात बोलवले होते.
मागील पंधरा दिवसापूर्वी या खेळाडूंचे सराव शिबिर झाले. त्यातून वीस जणांच्या संघाची निवड झाली आहे. यामध्ये हिंगोलीच्या सनी पंडित यांचा समावेश आहे. कोविडमुळे वाढीव पाच खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ ता. १ जानेवारी रोजी बडोदा येथे पोहचणार आहे. बडोदा येथे ता. १० जानेवारी ते ता. २५ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहा राज्यातील संघ सहभागी होणार आहे.
हेही वाचा - नांदेड : विरोधी संचालकांच्या तगाद्याने अखेर सहकारी पतपेढीचे लाभांश धनादेश बँकेत जमा -
दरम्यान, सनी पंडित याने आतापर्यंत अनेक स्पर्धेत भाग घेतला असून त्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. शालेय स्पर्धेत सहभागी होत त्याने क्रिकेट स्पर्धाना सुरुवात केली आहे. महाविद्यालयात असताना त्याने विविध स्पर्धेत सहभागी होत यश संपादन केले आहे. या खेळाची आवड असल्याने तो सतत खेळत गेला व यश मिळत गेले. आता त्याची निवड बडोदा येथे होणाऱ्या स्पर्धेत राज्याच्या संघात झाली आहे.
सनी पंडित यांच्या निवडीबद्दल शामकांत देशमुख, शेख रशीद, संतोष लोंढे यांच्यासह हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
|