esakal | लॉकडाउनच्या काळात खवय्यांचा हिरमोड, कसा ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सध्या गुजरात, कर्नाटक, आंध्राप्रदेश, कर्नाटक राज्यातून बादाम, लगडा, केशर, अशी मोचक्या वाणाची आंबे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. ही आंबे परराज्यातुन येत असल्याने ग्राहक आंबे खरेदीसाठी धजावत नाहीत

लॉकडाउनच्या काळात खवय्यांचा हिरमोड, कसा ते वाचा...

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : उन्हाळा आला की बाजारात आंबट- गोड मधुर फळांची रेलचेल सुरु होते. यात आंब्यांची सर्वांनाच प्रतीक्षा असते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्त, पितृपक्ष आणि रमजानचा महिणा सुरु असल्याने नांदेड जिल्ह्यात गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून विविध प्रकारचा आंब्यांची आवक सुरु झाली आहे. मात्र, या आंब्यांना नैसर्गिक गोडवा नसल्याने खवय्यांचा चांगलाच हिरमोड होत आहे.

‘कोरोना’मुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे. मात्र, यामुळे महाराष्ट्रातील हजारो टन हापुस आंब्यांची विदेशात निर्यात होऊ शकली नाही. हापूस आंबा रत्नागिरी, देवगड, नासिक, सांगली अशा विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. तो आंबा आहे त्या ठिकाणी पडुन आहे. सध्या गुजरात, कर्नाटक, आंध्राप्रदेश, कर्नाटक राज्यातून बादाम, लगडा, केशर, अशी मोचक्या वाणाची आंबे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. ही आंबे परराज्यातुन येत असल्याने ग्राहक आंबे खरेदीसाठी धजावत नाहीत.‘कोरोना’ प्रादूर्भाव वाढत असल्याने बाजारातील आंबे खाण्यावर बहुतेक ग्राहकांची इच्छा नसली तरी, एकदा रसाळीचा आनंद घेऊनच बघुच म्हणून ग्राहक आंब्याकडे आकर्षित होत आहेत.

खवय्यांच्या तोंडाची चव बिघडली

विशेष म्हणजे नेहमी अर्धपिकलेल्या आंब्यावर विविध रसायनांचा वापर करुन आंबे पिकविली जातात. त्यामुळे आंब्यांची नैसर्गिक चव बिघडते. मात्र, यंदातरी खवय्यांना मनसोक्त अस्सल नैसर्गिंक आंब्यांचा गोडवा चाखता येईल असे वाटत होते. मात्र, नेहमीप्रमाणेच बाजारात उपलब्ध झालेले बहुतेक आंबे नैसर्गिक पद्धतीने न पिकवता ते नेहमीप्रमाणे कारपेट टाकुन पिकवल्याने खवय्यांच्या तोंडाची चव बिघडली आहे.

हेही वाचा- Video : ‘तो’ सापडला...मग काय...झाली की सुरु पळापळ

लिंबगावच्या आंब्यावर नांदेडकरांची मदार
नांदेड जिल्ह्यास लागुन असलेल्या लिंबगाव शिवारात बहुतेक शेतकऱ्यांनी लंगडा, गावरान केशर आंब्यांची लागवड केली आहे. त्यामुळे हा आंबा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने तो नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यावर भर दिला गेला आहे. त्यामुळे नांदेडकरांना या आंब्यावर विसंबुन रहावे लागत आहे. नांदेड शहरात फार मोजक्या ठिकाणीच हापूस आंबा उपब्ध आहे. त्यामुळे दोनशे रुपये किलोने हापूसची विक्री सुरु आहे तर, बादाम- ८०-७०, केशर-१० ते १५०, शेंदरी गावरान शंभर रुपये किलो दराने विक्री सुरु आहे.

हेही वाचा-  विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी घेतली ‘लॅब’ची धसकी, कशामुळे? ते वाचाच

परराज्यातून आलेला आंबा सडण्याची भीती

‘कोरोना’ व्हायरसच्या भीतीमुळे सजग नागरिक बाजारातून आनलेला भाजीपाला देखील मिठाच्या पाण्याने धुवून खात आहेत. त्यामुळे परराज्यातून आलेला आंबा खाण्यासाठी कुणीही धजावत नाही. त्यामुळे रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंब्याला कुणीच भाव देत नसल्याने बाजारातील आंबा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


कोरोना’मुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती
अक्षय तृतीया किंवा पितृपक्षात नेहमी आंब्याची विक्री जास्त असते. परंतु, ‘कोरोना’मुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक परराज्यातुन आलेल्या आंबे खाण्यास भीत आहेत. त्याऐवजी लोक चिकु, टरबुज, खरबुज, काकडी, लिंबुशरबत, मोसंबी, संत्री अशी जिल्ह्यात मिळणाऱ्या फळे खाण्याकडे वळली आहेत.

- डॉ. देवीकांत देशमुख, कृषी तज्ज्ञ. 

शेतकऱ्यांचे नुकसान झाले
आंब्यांच्या सिझनमध्ये कोरोनाचे संकट'ओढवल्याने केवळ आंबेच नव्हे तर, इतर फळ पिकांचे देखील न मोजता येणारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शंकर अण्णा धोंगडे (शेतकरी)