Beed Railway
sakal
मराठवाडा
Beed Railway: परळीकरांचा ७५ वर्षांनी प्रवास, आदमानेंनी पहिल्यांदा पाहिली रेल्वे; १२९४ जणांचा तिकीट काढून प्रवास परळीकरांचा
Beed Train News : ४० ते ४५ वर्षांपासून कायम रेल्वे येणार, असे ऐकणारे बीडकर त्या रेल्वे धावताना पाहण्याच्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार झाले. बुधवारी उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच परिसरातील रेल्वेस्थानकाला यात्रेचे स्वरूप आले.
बीड : ४० ते ४५ वर्षांपासून कायम रेल्वे येणार, असे ऐकणारे बीडकर त्या रेल्वे धावताना पाहण्याच्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार झाले. बुधवारी (ता. १७) उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच परिसरातील रेल्वेस्थानकाला यात्रेचे स्वरूप आले. महिलांसह लहान मुले आणि आबालवृद्धांनी रेल्वेस्थानकावर गर्दी केली होती.