औसा : हासेगाव (ता. औसा) येथील एचआयव्ही संक्रमित मुलांचे बालगृह असलेल्या सेवालायात एका ‘एचआयव्ही’बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार व चार महिन्यांनी गर्भपात केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे..तिच्या फिर्यादीवरून संस्थाचालक रवी बापटले, रचना बापटले, अमित महामुनी, पूजा वाघमारे, राणी व लातूरच्या ममता हॉपिटलच्या डॉक्टरवर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. धाराशिव पोलिसांनी ‘झिरो एफआयआर’ने हा गुन्हा औसा पोलिसांकडे वर्ग केला..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२३ ते २३ जुलै २०२५ या काळात ‘एचआयव्ही’बाधित अल्पवयीन मुलीववर ‘सेवालया’तील अमित महामुनी याने चारवेळा अत्याचार केला. विरोध केला असता त्याने पीडितेला मारहाण केली. याबाबत कोणाला काही सांगितल्यास आणखी मारहाणीची धमकी दिली. .घडलेला प्रकार पीडितेने संस्थाचालक रवी बापटले व रचना बापटले यांना सांगितला. मात्र, त्यांनीही दखल घेतली नाही. कोणीच न्याय देत नसल्याने तिने अत्याचाराबाबत चिठ्ठी लिहून तक्रार पेटीत टाकली. मात्र, पूजा वाघमारे नामक महिलेने ही चिठ्ठी काढून फाडून टाकली..Nagpur Rain Update: हवामान विभागाचा अलर्ट ठरला फुसका; नागपुरात मुसळधारऐवजी हलका शिडकावाच, आजही इशारा.दरम्यान, पीडितेला उलट्या, मळमळ होऊ लागल्याने लातूर येथील ममता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळले. याच हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला. त्यावरून हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिवशंकर मनाळे तपास करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.