लातूर जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी गृह विलगीकरणाची कास, का वाचा

हरी तुगावकर
Monday, 7 September 2020

लातूर  जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण बाधितांचा आकडा साडे नऊ हजाराच्या वर गेला आहे. असे असताना सौम्य लक्षणे असलेले व्यक्ती आता गृह विलगीकरणमध्ये राहून घरातच उपचार घेवून बरे होत आहेत.

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण बाधितांचा आकडा साडे नऊ हजाराच्या वर गेला आहे. असे असताना सौम्य लक्षणे असलेले व्यक्ती आता गृह विलगीकरणमध्ये राहून घरातच उपचार घेवून बरे होत आहेत. सध्या जिल्ह्यात ३४१ व्यक्ती गृह विलगीकरणमध्ये पण  गृह विलगीकरणमध्ये राहत असताना काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

महापालिकेच्या वतीने या संदर्भात एक माहिती पुस्तिका काढून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पद्धतीत नागरीकांचा पैसा तर वाचतोच आहे पण आत्मविश्वासही वाढण्यास मदत होत आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होण्यास मदत होत आहे. देश व राज्यात कोरोना बाधितांची संख्येत प्रचंड वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

वकिलानांच करावे लागले निदर्शने, न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची मागणी

साडेनऊ हजारापेक्षा जास्त जणांना याची लागण झाली. शासनाने गेल्या महिन्यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णासाठी गृह विलगीकरण करण्याची मुभा दिली. पण त्या करीता रुग्णाच्या घरी तशी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. तरच गृह विलगीकरणामध्ये राहून घरातच उपचार घेवून कोरोनावर मात करता येणार आहे. घरात बसून उपचार घेताना काळजीही तितकीच घेणे महत्वाचे आहे. सध्या जिल्ह्यातील ३४१ व्यक्ती गृह विलगीकरणमध्ये उपचार घेत आहेत. यात आता महापालिकेने देखील गृह विलगीकरणसंदर्भात एक माहिती पुस्तिका काढून प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. गृह विलगीकरणमध्ये उपचार घेण्याची संख्या वाढली तर आरोग्य यंत्रणेवरचा मोठा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

महापालिकेकडून प्रबोधन

गृह विलगीकरणच्या तीन पायऱया

--आरोग्य कर्मचाऱयांचे पथक घरी भेट देवू रुग्णाच्या तब्यतेची माहिती घेवून निवासस्थानाची पाहणी करून होम आयसोलेशन करता येईल का याची माहिती देणार.
--होम आयसोलेशनसाठी रुग्ण सक्षम असल्यास रुग्णाला दूरध्वनीवरून प्रशिक्षण दिले जाणार. पुढील दहा दिवस तब्येतेची दररोज दूरध्वनीवरून माहिती घेतली जाणार.
--रुग्णाची पॉझिटीव्ह चाचणी आल्यानंतर दहा दिवसाने व शेवटच्या तीन दिवसात ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास रुग्ण होम आयसोलेशन संपवू शकतो. या संदर्भात दूरध्वनीवरून सूचना दिली जाणार. रुग्णाने त्यानंतर सात दिवस घरातच राहून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे.

कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले?

घरात अशी व्यवस्था हवी

--कोरोना रुग्णासाठी घरात खेळती हवा असलेली व स्वतंत्र स्वच्छतागृह असलेले खोली असावी.
--रुग्णाची काळजी घेण्यासाठी घरात एक परिचारक (काळजी घेणारी व्यक्ती) असावी.
--घरात ५५ वर्षापेक्षा जास्त वयाची, गर्भवती किंवा कर्करोग, तीव्र दमा, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, मूत्रपिंडविकार असे गंभीर रुग्ण असू नयेत. असे रुग्ण असल्यास कोरोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत अशा रुग्णांची इतरत्र व्यवस्था करावी.
--कोरोनाच्या रुग्णाने घरात इतरत्र फिरू नये. दारे, खिडक्या, टेबलला हात लावू नये. त्याचा इतरांना संसर्ग होवू शकतो.
--रुग्णांची भांडी, टॉवेल अशा वैयक्तीक वापराच्या वस्तू कुटुंबातील इतर व्यक्तीनी वापरू नयेत.
--दररोज दोन वेळा पंधरा ते वीस मिनिट गरम पाण्याची वाफ घ्या.
--रुग्णाला जेवण त्यांच्या खोलीबाहेर एखाद्या स्टूलवर किंवा टेबलवर ठेवावे.
--रुग्णाची खोली, स्नानगृह, स्वच्छतागृह दिवसातून एकदा स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Quarantine Good Option To Corona Patients Latur News