
Latur| बंधाऱ्यांची पाहणीसाठी आलेल्या अभियंत्यांवर मधमाशांचा हल्ला
मदनसुरी (जि.लातूर) : लिंबाळा (ता.निलंगा) येथील निम्न तेरणा नदीवरील बंधाऱ्याची पावसाळा पूर्व तपासणी करण्यासाठी लातूर येथून आलेल्या पाटबंधारे विभागाच्या दोन अभियंत्यांवर मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ते जखमी झाले. लिंबाळा येथील तेरणा नदीवरील बंधाऱ्याची पावसाळा पूर्व पाहणी करण्यासाठी लातूर (Latur) येथील पाटबंधारे विभागातील अधीक्षक अभियंता ए.एस. म्हेत्रे व कार्यकारी अभियंता रोहित जगताप हे आपल्या उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, उपविभागीय अधिकारी सुनील मुळे, शाखा अभियंता कृष्णदेव येणगे, शाखा अभियंता शेख चांद यांच्यासह सहा लोकांच्या टीमसोबत पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता.११) दुपारी आले होते. (Honey Bees Attacks On Engineers Who Came For Inspecting Barrages In Latur)
हेही वाचा: संभाजी राजे निवडणूक लढणार, नव्या संघटनेची घोषणा
त्यांनी बंधाऱ्यांची दरवाजे खालीवर केली. दरवाजे खालीवर करत असताना हालचाल होऊन येथील दरवाजाला बसलेल्या आग्या मोहाळाच्या मधमाशा उठल्या आणि ए. एस. म्हेत्रे यांना तीस ते चाळीस माशांनी चावा घेतला, तर रोहित जगताप यांना दहा ते पंधरा माशांनी चावा घेतला. येथे मधमाश्यांचा पोळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. मधमाशांनी (Honey Bees) चावा घेतल्यानंतर त्यांना निलंगा येथील श्वास या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा: तुळजापुरात कडकडीत बंद, बंदोबस्तासाठी 100 पोलिस तैनात
त्यांच्यावर उपचार करून त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. रोहित जगताप यांना कसलाही त्रास नसून म्हेत्रे यांना थोडा त्रास होत आहे. दोन-तीन दिवसांत त्यांच्याही पूर्ण आराम मिळेल असे डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रोहित जगतात यांनी दिली.
Web Title: Honey Bees Attacks On Engineers Who Came For Inspecting Barrages In Latur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..