नांदेड जिल्ह्यातील गुणवंताचा पुरस्कार देऊन सन्मान

फोटो
फोटो

नांदेड :  जिल्ह्यात विविध क्षेत्रात आपली कला जपत नांदेडचे नाव देश व राज्य पातळीवर नेणाऱ्या काही अधिकारी व कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय मैदानावर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबाबत राखीव पोलीस उपनिरीक्षक (राखीव) जमिल ईस्माईल सय्यद, राष्ट्रीय स्पर्धेत लॉन टेनिसमध्ये कांस्य पदक प्राप्त केंद्रीय विद्यालय नांदेडचे कर्तव्य दिगंबर करंडे, २२ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा- २०१९ अमरावती पुरुष गट वैयक्तिक शंभर मीटर बॅक स्ट्रोकमध्ये कास्य पदक प्राप्त नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांना सन्मानीत करण्यात आले. 

आरोग्य सेवेतील डॉक्टर्स मानकरी

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. यामध्ये अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, प्राध्यापक व विभाग प्रमुख नेत्रशास्त्र विभाग डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एस. चव्हाण, सह. प्रध्यापक मनोविकार शास्त्र विभाग डॉ. प्रदीप बोडके, सिस्टर इनचार्ज लेबर ओटीचे कमल शिरिष खरात, ग्रीन कॉरीडोर यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय कामाबाबत वाहन चालक हनुमान डोईफोडे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. 

स्काऊट गाईडस पुरस्कार

राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईडस पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कुनाल किशोर तावडे, मनोज खुशालराव येरेवाड, वसंत उत्तम सोमशेटवार, गजानन राजू पवार, श्रृती विठ्ठलराव शिंदे, अनुष्का किशोर वाकडे, जयेश जनार्धन देशमुख, जगदिश विश्वांभर बामणे, कपील चंद्रकांत येवते, अंकिता एकनाथ दळवी, आशा नागेशराव खनसोळे, दिशा बालाजी एंगडे, शिवहर शंकर स्वामी, सार्थक सारंग नेरलकर, अनु सुर्यकांत जमदाडे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. 
  
महिला बचत गट

महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत उद्योग करणाऱ्या महिला बचत गटातील जय दुर्गा महिला बचतगट नाळेश्वर, अंबीका महिला बचतगट धर्माबाद, महालक्ष्मी महिला बचतगट सरसम, समृद्धी महिला बचतगट पंचशिलनगर नांदेड, मदिना महिला बचतगट मेदनकलूर (ता. देगलूर), सागर महिला बचतगट दुलेशह रहेमाननगर नांदेड यांचा अध्यक्ष व सचिव यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com