Accident : चाकूर जवळ भीषण तिहेरी अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

चाकूर शहराच्या जवळील लातूर-नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटी जवळ शनिवारी (ता. १३) भीषण तिहेरी अपघात झाला.
chakur accident

chakur accident

sakal

Updated on

चाकूर - चाकूर शहराच्या जवळील लातूर-नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटी जवळ शनिवारी (ता.१३) सायंकाळी सहा वाजता भीषण तिहेरी अपघात झाला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात धोडे जेऊन गावाकडे जाणाऱ्या दुचाकीवरील दोघा पती पत्नीचा तसेच कारमधील एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com